नवी मुंबई, 30 मे: राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान परराज्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी (liquor smuggling) होत असल्याचं समोर येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) अशाच एका दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. गेल्या पाच दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 1 कोटी 40 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त (1.40 crore rs liquor seized) केला आहे.
महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यातून मद्य तस्करी होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नवी मुंबईतील तुर्भे नाका येथील पुलाखाली पाळत ठेवून एक ट्रक रोखला आणि त्याची तपासणी केली असता त्यात मोठा मद्यसाठा आढळून आला.
या ट्रकमध्ये ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंजर्स, एरोबेला वोडका, एम्पेरियल ब्ल्यू विस्की या ब्रँडच्या 750 मिलीचे 108 बॉक्स आणि 190 मिलीचे 16 बॉक्स तसेच बडवायझर बिअरचे 500 मिलीचे टीनचे 150 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी प्रकरणी उदयलाल गौतमलाल मीना या आरोपीला अटक करुन त्याच्या ताब्यातून गोवा राज्यात विक्रीसाठी निर्मिती केलेल्या व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या भारतीय बनावटी विदेशी मद्य व ट्रकसह रुपये 37,81,864/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कऱण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल 1 कोटींचा मद्यसाठा जप्त5 दिवसांत 1 कोटी 40 लाखांचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 मे रोजी गोव्याहून मुंबईत येणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 56,50,500 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. तर दुसऱ्या एका कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उस्मानाबाद येथे गोव्यात निर्मिती आणि विक्रीसाठी असलेला मद्यसाठा जप्त केला. ज्याची किंमत 43,93,000 रुपये इतकी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.