राज्याच्या कॅबिनेटची आज बैठक; शेतकरी कर्जमाफीबाबच होणार चर्चा?

राज्याच्या कॅबिनेटची आज बैठक; शेतकरी कर्जमाफीबाबच होणार चर्चा?

  • Share this:

13 जून : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचे निकष ठरवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे कर्जमाफी देताना कशाप्रकारे खबरदारी घ्यायची, याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारच्या आज बैठकीत काय निर्णय होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. यात शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देणार असल्याचं सरकारने घोषित केलं होतं.

भाजप कोअर कमिटीची काल रात्री उशीरा बैठक झाली, भाजपचे सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते . कर्जमाफीच्या मुदद्यावर काल संध्याकाळी शरद पवार , अशोक चव्हाण, जयंत पाटील अजित पवार यांच्या सोबत चंद्रकांत पाटील यांच्यात जी चर्चा झाली त्या बैठकीतल्या मुद्द्याबाबंतही कोअर कमिटीत चर्चा झल्याचा अंदाज आहे. कॅबिनेट बैठकीत आजच्या कर्जमाफीचे निकष ठरणार नसून कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीने निकष ठरवल्यानंतरच ते कॅबिनेटच्या मंजूरीसाठी ठेवले जातील असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्जमाफीसाठी जमिनीची कुठलीही अट नसेल असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर करदात्यांना कर्जमाफीतून वगळण्याचे संकेतही चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत. त्यामुळं नोकरदारांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

कशी असेल तत्वतः कर्जमाफी ?

- इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ नाही

- शेतकऱ्यांच्या घरातील कोणीही सरकारी नोकरीत नसावा

- आयकर, सरकारी नोकरी नसल्याच्या प्रतिज्ञापत्राची आवश्यकता

-  कर्जमाफीसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, लिंक्ड बँक अकाऊंट सक्तीचे

- पॅनकार्ड नसल्यास वैध प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार

- कोणतेही प्रतिज्ञापत्र खोटे आढळल्यास कायदेशीर कारवाई

-  भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेचे लाभ मिळणार नाही

- वीजचोरी, लोन डिफॉल्टर असल्यास कर्जमाफी लाभ नाही

- 7/12 मध्ये किंवा रेशनकार्डात सामायिक नोंद आहे असे सर्व सदस्य

First published: June 13, 2017, 12:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading