मुंबई, 04 जानेवारी : राज्यातील खातेवाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. खातेवाटप शनिवारी जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सविस्तर बातमी - महाविकासआघाडीची मोठी बातमी, शनिवारी कुठल्याही क्षणी होणार खातेवाटप!
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केलं. यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला आहे. यात 6 जण ठार झाले असून तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. ठार झासलेले लोक इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीचे असल्याचं सांगितलं जात आहे. हा हल्ला बगदादमधील ताजी भागात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
सविस्तर बातमी - अमेरिकेचा इराणवर आणखी एक हल्ला, 6 जण ठार
अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे रुपया चांगलाच घसरलाय. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 71.80 वर गेलीय. याचा अर्थ एका डॉलरसाठी आपल्याला 71 रुपये 80 पैसे मोजावे लागतील.
सविस्तर बातमी - रुपया गडगडल्याने महागाईत आणखी भर, या गोष्टींना बसणार फटका
अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. या हल्ल्यामुळे 6 गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे आधीच असलेल्या महागाईध्ये आणखी वाढ होण्याचा धोका आहे.
सविस्तर बातमी - अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम
CAAच्या विरोधात सर्व देशभर विरोध प्रदर्शन होत आहेत. जगभर त्याची दखलंही घेतली गेलीय. या प्रकरणी पाकिस्तान खोटा प्रचार करत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक फेक व्हिडीओ ट्वीट करत उत्तर प्रदेश पोलीस मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचा दावा केला होता. यावरून पाकिस्तान भारतातल्या आंदोलनाचा गैरफायदा घेत खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड झालंय.
सविस्तर वाचा -इम्रान खाननी TWEET केला भारतीय पोलिसांच्या अत्याचाराचा Fake VIDEO; UP पोलिसांनी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.