मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वसुलीबाज हॉस्पिटलमध्ये पोहोचले राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, बिलावरून कर्मचाऱ्यांना झापले, VIDEO

वसुलीबाज हॉस्पिटलमध्ये पोहोचले राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, बिलावरून कर्मचाऱ्यांना झापले, VIDEO

दादा भुसे यांनी रुग्णांना दिलेली अव्वाच्या सव्वा बिलं दाखवत हॉस्पिटल प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.

दादा भुसे यांनी रुग्णांना दिलेली अव्वाच्या सव्वा बिलं दाखवत हॉस्पिटल प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.

दादा भुसे यांनी रुग्णांना दिलेली अव्वाच्या सव्वा बिलं दाखवत हॉस्पिटल प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.

मनमाड, 29 मे : कोरोनाच्या (Corona)महामारीत एकीकडे डॉक्टर (Doctors) आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने (MVA Goverment) ठरवून दिलेले नियम मोडत खासगी हॉस्पिटलकडून (Private Hospitals) मनमानी पद्धतीने वसुली सुरूच आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मालेगावमध्ये अव्वाच्या सव्वा बिल घेणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले.

खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा बिल वसुल करण्याच्या घटना थांबता थांबेना. असाच प्रकार मालेगावमध्ये समोर आला. सिक्स सिगम नावाच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मोठया प्रमाणात बिल उकळण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर पोलीस व मनपाचे अधिकारी सोबत घेऊन कृषिमंत्री दादा भुसे थेट या हॉस्पिटलमध्ये गेले व त्यांनी हॉस्पिटलची झाडाझडती घेतली. हॉस्पिटलमध्ये बिलांच्या बाबती गैरप्रकार घडल्याचे दादा भुसे यांना आढळून आले त्यांनी या बाबत तपास करण्याची पोलिसांना सूचना केली.

अरे बापरे! लग्नात सोशल डिस्टन्सिंसाठी नवरदेवाची भलतीच शक्कल, Funny Video Viral

दादा भुसे यांनी रुग्णांना दिलेली अव्वाच्या सव्वा बिलं दाखवत हॉस्पिटल प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. शासकीय नियमाप्रमाणे किती बिलं दिली, अशी थेट विचारणाच पोलिसांसमोर केली.

ट्विटर VS सरकार वॉर! रविशंकर प्रसाद म्हणातात- डिजिटल सार्वभौमत्त्वाशी तडजोड नाही

राज्याचे कृषीमंत्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कोरोनाच्या काळात खासगी हॉस्पिटलकडून लूट सुरू असल्याच्या घटना समोर येत आहे. एकीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पण शासकीय आदेश न जुमानता वारेमाप वसुली सुरूच आहे. त्यामुळेच कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन हा प्रकार उघडकीस आणाला आहे.

First published: