मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा'', राज्यातल्या चित्रपटगृहांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

''योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा'', राज्यातल्या चित्रपटगृहांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 18 ऑक्टोबर: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वांच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

राज्यातील चित्रपटगृहांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसंच यावर एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहेत. येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या बैठकीस खासदार , ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे देखील उपस्थित होते.

हेही वाचा- गुरू माँ कांचनगिरी- राज ठाकरेंच्या भेटीवर महापौरांचं आक्रमक उत्तर 

या बैठकीत सिनेमागृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे, मात्र 50 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा झाली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

हेही वाचा- पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक, कोर्टात करणार हजर 

याशिवाय हॉटेल्स, मॉल्स आणि सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यासाठी असलेले कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबतही चर्चा केली. अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करण्याबाबत आणि कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतुकदारांना दिलासा देण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली आहे.

First published:

Tags: Uddhav Thackeray (Politician), शरद पवार