छत्रपती शिवरायांबाबत बोलताना तोल सुटला; 'त्या' कॉमेडियनने दिला माफीनामा

छत्रपती शिवरायांबाबत बोलताना तोल सुटला; 'त्या' कॉमेडियनने दिला माफीनामा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कऱणाऱ्या या  स्टँड-अप कॉमेडियनवर कारवाईची मागणी जोर धरू लागली.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन (stand up Comedian) अग्रिमा जोशुआ हिने थट्टा केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची तीव्र लाट उमटली. अग्रिमा जोशुआ असं या कॉमेडियनचं नाव आहे. तिनं शिवाजी महाराजांबाबत विनोद केला आणि तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. आता तिनं आपला माफीनामा दिला आहे.

कॉमेडियन अग्रिमा जोशुआने सादर केलेल्या विनोदात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. युवासेनेतून बाहेर पडलेल्या रमेश सोलंकी यांनी अग्रिमा जोशुआच्या वक्तव्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या असून कडक कारवाई करावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे.

अग्रिमा जोशुआ म्हणाली की, 'अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केले असता काही आढळले नाही. पण कुणीतरी एक निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल. दुसऱ्या एका जणाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे आणि त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवली जाईल. त्यानंतर मला तिसरा व्यक्ती सापडला ज्याने  शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा असं सांगितलं, बस्स मग मी त्यालाच फॉलो केलं.'

हे वाचा - विकास दुबेचं एन्काऊंटर वादाच्या भोवऱ्यात; विरोधाभासी निवेदनामुळे संभ्रम वाढला

या व्हिडीओत अग्रिमाने शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि अग्रिमा काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. मनसे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला.

सोशल मीडियावर कारवाईची मागणी जोर धरू लागल्यानंतर आणि मनसेने तोडफोड केल्यानंतर अग्रिमाने माफी मागितली आहे. यश रानडे यांच्याच फेसबुक पोस्टवर अग्रिमाने लेखी माफी मागितल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये एक लेखी माफीनाम्याची प्रतही त्यांनी दाखवली आहे.

अग्रिमाचा हा व्हिडिओ मागील वर्षीचा आहे. तिने तिच्या युटूब चॅनेलवर 5 एप्रिल रोजी अपलोड केला होता. यातला एक मिनिटांचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

Published by: Priya Lad
First published: July 10, 2020, 10:31 PM IST

ताज्या बातम्या