एसटीचा संपात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी

एसटीचा संपात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी

उद्धव ठाकरेंनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे

  • Share this:

20 ऑक्टोबर: आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे.प्रवाशांची राज्यभर प्रचंड गैरसोय होत असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मध्यस्थी केल्यामुळे आत हा संप मिटण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. चार दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आगारात थांबून आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा होत आहे. याशिवाय संप मिटल्यानंतर एसटी संघटनांचे कर्मचारी तसंच नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहे.

दरम्यान एसटी कर्मचारी आणि दिवाकर रावते यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. कर्मचाऱ्यांनी नवा प्रस्ताव स्वीकारावा अशी मागणी प्रशासनाने केली आहे. एकूण 2500 कोटींची पगारवाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. एसटी युनियनची मागणी 45% वाढीची आहे. सरकार 33% वाढीवर आलंय. तसंच नाईट आउट भत्ताही 100 रु सरकारने मान्य केलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत मागण्या ही पूर्ण करू असं आश्वासन सरकारने दिलं आहे.

त्यामुळे एकंदर आता चित्र पालटून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 01:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading