एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

अखेर रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने तरी हा प्रश्न सुटेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Share this:

19 ऑक्टोबर: गेले तीन दिवस चालू असललेला एसटी संप चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. या संपावर दिवाळी संपेपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता कठीणच दिसते आहे.

गेले काही दिवस प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये दोन-तीनदा बैठका झाल्या. पण दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे कुठलाच तोडगा निघाला नाही.

काल रात्री उशिरापर्यंत दानवे-एसटी कर्मचाऱ्यांची बैठक चालू होती. पण या बैठकीत काहीच निष्पन्न झालं नाही.दोन्ही बाजूनी ताठरता घेतल्यामुळे आजही बैठक होऊ शकली नाही.रावतेंच्या प्रस्तावावर महामंडळ ठाम आहे तर दुसरीकडे पगारवाढीच्या प्रस्तावावर कर्मचारी ठाम आहेत. अखेर रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने तरी हा प्रश्न सुटेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तेव्हा या प्रश्नावर तोडगा कधी निघणार हे पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 19, 2017, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading