मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ST मध्ये ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’, आसन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ST मध्ये ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’, आसन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल

एसटीने प्रवास करीत असाल तर काही महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाहा काय आहेत ते नियम

एसटीने प्रवास करीत असाल तर काही महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाहा काय आहेत ते नियम

एसटीने प्रवास करीत असाल तर काही महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाहा काय आहेत ते नियम

मुंबई, 18 मार्च : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी एसटीने कंबर कसली आहे.

एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा (Covid - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत असून, त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी काही सीट्स बैठक व्यवस्थेच्या बदललेल्या रचनेनुसार बंद ठेवण्यात येणार आहेत. दोघांच्या सीटवरील रांगेत फक्त एकाच व्यक्तीला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बस मधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या वाहतूक शाखेने आपल्या स्थानिक प्रशासनाला पाठवून दिले आहे.

संबंधित - #BREAKING मुंबईनंतर पुण्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद, राज्यातील आकडा 44

एक जबाबदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटीने या पूर्वीपासूनच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

एसटीने केलेल्या उपाययोजना

1 राज्यातील प्रमुख गर्दीचे बसस्थानके दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुणे.

2 प्रत्येक बस (सॅनिटायझर) लिक्विड मिश्रित पाण्याने दररोज धुवून काढणे.

3 गर्दीच्या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व लिक्विडची (सॅनिटायझर) बाटली देण्यात येत आहे.

4 प्रत्येक बसस्थानकावरील उद्घोषना यंत्राद्वारे प्रवाशांना कोरोना आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.

संबंधित - जालन्यातून दिलासादायक बातमी, 2 कोरोना संशयितांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

या उपाययोजनांच्या बरोबरच गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या मधील संभाव्य संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ,त्यांच्या बस मधील बैठक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. त्यानुसार बसेसच्या प्रत्येक दोन आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसवण्यात येईल. याप्रमाणे संपूर्ण बसमध्ये बस क्षमतेच्या केवळ 50 टक्केच प्रवासी बसवून, ती बस मार्गस्थ करण्यात येईल कोणत्याही बस मध्ये गर्दी टाळण्यासाठी उभे राहून प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. आवश्यकता वाटल्यास अशा ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत .याबाबत सविस्तर परिपत्रक एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात आले असून, प्रवासानी करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एसटीच्या या उपयोजना सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

First published:

Tags: Corona virus in india