पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचं मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन, प्रवाशांचे हाल

पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचं मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन, प्रवाशांचे हाल

पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचं मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू झालंय.भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे इथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत.

  • Share this:

08 जून : पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचं मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू झालंय.भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे इथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे येथील स्थानकांत बसेस उभ्या आहेत. मोबाईलवरील संदेशांमार्फत आणि पत्रकांमार्फत या संपाची माहिती पसरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत.

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांची मान्य नाही. हंगामी कर्मचारी म्हणून २५ टक्के पगारवाढ द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच ही पगारवाढीची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात शिवशाही, शिवनेरी या बसेस वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेस बंद आहेत. औरंगाबादचे मध्यवर्ती बस स्थानक, पुण्यातील शिवाजीनगर, भंडारा बस स्थानक, सांगलीच्या बसस्थानकांत बसेस आगारात उभ्या आहेत.

मात्र मनमाड एसटी कर्मचारी कृती समितीने पुकारलेल्या संपाचा मनमाड,मालेगाव,येवला,चांदवड, नांदगाव इथे परिणाम नाही. एसटी सेवा सुरळीतपणे सुरू आहे.

एसटी चालक वाहकांच्या वेतनातली तफावत

तेलंगणातील चालकाचा पहिल्या महिन्याचा पगार-32,052

कर्नाटक चालकाचा पगार - 30,380

महाराष्ट्र चालकाचा पगार - 11,515

तेलंगणा वाहकाचा पहिल्या महिन्याचा पगार - 30,233

कर्नाटक वाहकाचा पगार- 28,518

महाराष्ट्र वाहकाचा पगार -10,657

First published: June 8, 2018, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading