Home /News /maharashtra /

संप मिटेना अन् 2 महिन्यांपासून पगार नाही, शेतात जाऊन ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य!

संप मिटेना अन् 2 महिन्यांपासून पगार नाही, शेतात जाऊन ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य!

पंधरा दिवसापूर्वी भीमराव सदावर्ते नामक एस टी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येची ही नांदेडमध्ये दुसरी घटना आहे.

नांदेड, 07 जानेवारी : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर (st bus workers strike) कायम आहे. आज नांदेड (nanded) जिल्ह्यात आणखी एका एसची कर्मचाऱ्याने आत्महत्या (ST employee commits suicide in Nanded ) केल्याची घटना घडली आहे.  पंधरा दिवसापूर्वी भीमराव सदावर्ते नामक एस टी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येची ही नांदेडमध्ये दुसरी घटना आहे. यापूर्वी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कंधार आगारातील चालक संभाजी गुट्टे यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. संभाजी गुट्टे हे देखील या आंदोलनात सक्रिय होते. मागील दोन महिन्यापासून पगार नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. गेल्या चार-पाच  दिवसांपासून ते चिंतेत होते. आज सकाळी त्यांनी शेतात जाऊन विष प्राशन करून जीवन यात्रा संपवली. (मायलेकीने पोलीस बापाच्या डोक्यात घातला खलबत्ता, उपचारादरम्यान गेला जीव) मागील 66 दिवसांपासून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका नांदेडच्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद आहे. देगलूर आणि कंधार आगारातून मात्र एक-एक बस धावत आहे. शिवाय लातूर-नांदेड ही एक बस सध्या लातूर आगारातून सुरू आहे. दररोज एसटी संपाबाबात नव नवीन बातम्या येत आहेत. पण कुठलाच तोडगा निघत नाही. रोज वेगवेगळ्या आगारातील कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीच्या कारवाया केल्या जात आहेत. आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी थकल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय कारवाया होत असल्याने  कर्मचाऱ्यांवर दबाव आणि तणाव वाढला आहे. त्यातून अशा घटना देखील घडत आहेत. यातूनच कंधार आगारातील चालकाने आत्महत्या केली असा आरोप होत आहे. या  प्रकरणी कंधार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (हे आई-बाबांना कळालं तर...';पालकांच्या भीतीने 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या) दरम्यान, या घटनेला पूर्णपणे राज्य सरकार आणि एसटी  प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मयत कर्मचाऱ्याच्या मुलाने केला आहे. या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या