आसिफ मुरसल, सांगली, ता.12 ऑगस्ट : सव्वा रूपया. या सव्वा रूपयासाठी सांगलीतल्या एका एसटी कर्मचाऱ्याला 26 वर्षे वनवास भोगावा लागलाय. सरकारी अनास्था एखाद्याचं सुरळीत सुरू असलेलं आयुष्य कशा प्रकारे खडतर मार्गावर आणू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे सांगलीतले महादेव खोत. मात्र खडतर मार्गावरही आयुष्याचा प्रवास कायम ठेवत स्वाभिमानी महादेव खोतांनी न्यायाची लढाई जिंकली आणि आपल्यावरचा डाग पुसून काढला.
वयाच्या 62व्या वर्षीही शिवारात राबणाऱ्या महादेव खोतांचा वनवास अखेर संपलाय. मात्र त्यासाठी महादेव खोत यांना तब्बल 26 वर्षे कायद्याची लढाई लढावी लागलीय आणि ती देखील फक्त सव्वा रूपयांसाठी.
सांगलीचे रहिवासी असणारे महादेव खोत एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. प्रवाशांकडून सव्वा रूपये घेऊन त्याला तिकीट न दिल्याचा ठपका महादेव खोतांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कारवाईपोटी त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.
मात्र या लढाईबरोबर संसाराचा गाडा खेचण्याची जबाबदारी देखील त्यांना पेलायची होती. कोर्ट कचेरीला लागणाऱ्या पैश्यांसाठी खोत यांनी आपल्या कुटुंबियांसोबत 26 वर्षे शेतीत घाम गाळला.
कामगार न्यायालयापासून सुरू लढा उच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला. अखेर उच्च न्यायालयानं महादेव खोतांवरचे आरोप बाजुला सारत, त्यांना 22 वर्षांचे वेतन आणि सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिलेत न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या 26 वर्षांचा खडतर प्रवासाचं चिज झालं ही त्यांची आज भावना आहे.
फ्रेंडशिप डेला 10वीच्या विद्यार्थ्याने मित्रांना वाटले वडिलांचे 46 लाख रुपये !
न्यायालयाच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला महादेव खोत यांना त्यांचा थकीत पगार देणं अनिवार्य आहे. तो त्यांना मिळेलही. मात्र ऐन उमेदीच्या वयात आयुष्याची 26 वर्षे त्यांना कोण परत करणार?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corruption charges, Laldabba, ST, St condoctor, Stbus, एसटी, एसटी महांडळ, कोर्ट, भ्रष्टाचार