संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

चार दिवस पुकारलेल्या संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय

  • Share this:

30 आॅक्टोबर : ऐन दिवाळीत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कापला जाणार आहे. 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय.

चार दिवस पुकारलेल्या संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय. सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने संपकरी कर्मचाऱ्यांच्या पगार कापला जाणार आहे.  एक दिवस संपाचा दंड म्हणून 7 दिवसांचा पगार कापणार आहे.  महामंडळाच्या या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

 

एसटी संपाचा संपूर्ण घटनाक्रम

दिवस पहिला - 17 ऑक्टोबर

- सकाळी ११.०० वा. सरकारने संपकऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं

-दुपारी ३ नंतर प्रशासनाच्या बरोबर चर्चेची पहिली फेरी झाली

-मार्ग निघाला नाही, संप मागे घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

-प्रवासी विविध ठिकाणी अडकले, आगाराच्या विश्रांतीगृहात बस चालक, वाहकांचा मुक्काम

-दुपारी ४ वा. एसटीच्या संपामागे काँग्रेस असल्याचा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा आरोप

-कामावर हजर न झाल्यास कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा

दिवस दुसरा - 18 ऑक्टोबर

- सकाळी पुन्हा प्रशासनाचं चर्चेचं आमंत्रण, सकाळी ११ वा. प्रशासनाबरोबर चर्चेला सुरुवात

-चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी पुन्हा ३ नंतर सुरु

-चर्चेच्या दोन्ही फेऱ्या अयशस्वी

-सकाळी ११ ते संध्याकाळी ५ परिवहन मंत्री दिवाकर रावते कर्जमाफीच्या कार्यक्रमात व्यस्त

-दुपारी २ वा. परिवहन मंत्री दिवाकर रावते एसटी संपावर प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर संतापले

-संध्याकाळी ७ वा. बस आगारांच्या विश्रांतीगृहात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रामगृह सोडण्याच्या प्रश्सनाच्या सूचना

-संध्याकाळी उशिरा मंत्री रावते यांच्याबरोबर कामगार संघटनांची चर्चेला सुरुवात

रात्री २ वाजेपर्यंत चर्चा सुरुच, तोडगा नाही

दिवस तिसरा - 19 ऑक्टोबर

-एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची स्थिती

-सकाळी ९ वा. एसटी कर्मचारी संपात मध्यस्ती करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांचा पुढाकार घेतल्याची बातमी

-दिवाळीच्या दिवशीही प्रवाशांचे हाल सुरूच

21 आॅक्टोबर - हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटीचा संप अखेर मागे

 

First published: October 30, 2017, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading