पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका

पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका

विद्यार्थी आणि प्रवासी तब्बल 5 तास पुलावर अडकले होते. स्थानिक गावकरी आणि प्रशानाच्या मदतीमुळे त्या सगळ्यांवरचं संकट टळलं.

  • Share this:

नरेंद्र मते, वर्धा 30 जुलै : शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन निघालेली बस सकाळी दोन नाल्यांच्या पूरात अडकल्याने 29 विद्यार्थी बसमध्येच अडके. जवळपास चार ते पाच तासांनी विद्यार्थ्यांसह 29 प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या प्रकारानं विद्यार्थी, प्रवाशांना मात्र सहन करावा लागला. वर्धा आगाराची वरुड ते वर्धा ही बस वरुड, मोझरी, खानगाव या गावांतील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन वर्ध्याकडं निघाली होती.

डौलापूर पार केल्यानंतर बस कोसुर्ल्याला जात होती. दरम्यान रात्रीच्या पावसामुळं कोसुर्ल्याच्या गावापूर्वी असलेल्या नाल्यावरील पूल पाण्याखाली आला. त्यामुळं चालकानं बस परत डौलापूरला नेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत डौलापूरजवळच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागलं. पुलावरून पाणी असल्यानं बस मध्येच अडकली. हिंगणघाटचं तहसील प्रशासन, अल्लीपूर पोलिस आणि गावकर्‍यांनी प्रवाशी तसंच विद्यार्थ्यांना दोर बांधून सुरक्षित रेस्क्यू केलं. यामध्ये जवळपास 5 तास प्रवाशी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाच्या गाडीनं प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना गावी पोहोचवण्यात आलं.

'सिलेंडर'चा ट्रक पुलाला धडकला, 100 सिलेंडर नदीत गेले वाहून

मुसळधार पावसात दरोडा

पुण्याजवळच्या देहूरोड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पडणाऱ्या पावसाचा चोरांनी चांगलाच फायदा उचलला आहे. पावसामुळे रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस तसेच बाजारपेठेची रखवाली करणारे वॉचमेन फिरकले नसल्यानं चोरट्यांनी चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय.

देहूरोड बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेले उजाला इलेक्ट्रॉनिक्स, रतन मेडिकल, कुमार ड्रेसेस ,तसेच संजय मेटल या दुकानात चोरट्यांनी आपला हात साफ केलाय. विशेष म्हणजे कुठल्याही अवजाराचा उपयोग न करता चोरट्यांनी मोठ्या शिताफीने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करत लाखो रुपयाचे मोबाइल तसेच इतर दुकानातून महागडे साहित्य लंपास केले.

शाळा सोडली पण छेडछाड थांबली नाही, 10 वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

इलेक्ट्रॉनिक्स शो रूम मध्ये लावण्यात आलेल्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरांची हात सफाई स्पष्टपणे कैदी झाली. एकाच रात्रीत चार दुकानात चोरी झाल्याने शहरातील व्यापारी चांगलेच भयभीत झाले आहेत. देहूरोड पोलिसांनी चारही दुकानातील चोरीला गेलेल्या वस्तूंचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही कॅमेरे च्या आधारे दोन चोरांचा शोध सुरू केलाय.

मुसळधार पाऊस असला तरी बेसावध न राहता काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आता जास्त सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याआधी आमदार पिचड यांना मतदारसंघातच धक्का

नदीच्या प्रवाहात 100 सिलेंडर्स गेले वाहून

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. संतधार पावसाने रस्तेही निसरडे झाले आहेत. जिल्ह्यातल्या आजरा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ट्रक नदीवरच्या पुलाला धडकला. यात ट्रकचा भाग पुलाकडे झुकला गेला. या ट्रकमध्ये सिलेंडर होते. अपघातातमुळे ट्रकमधे सगळे सिलेंडर नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग होता. त्यामुळे पाण्यात सगळीकडेच सिलेंडर दिसून लागल्याने एकच खळबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 04:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading