कोर्टाच्या आदेशानंतर एसटीचा संप अखेर मागे, प्रवाशांना भाऊबिजेला दिलासा

कोर्टाच्या आदेशानंतर एसटीचा संप अखेर मागे, प्रवाशांना भाऊबिजेला दिलासा

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्चस्तरीय समिती तयार केली जाणार आहे, तसंच अंतरिम वाढ देण्याबाबतचा निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत घ्यावा, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

  • Share this:

21 आॅक्टोबर : चार दिवसांनंतर अखेर एसटी सपं मागे घेण्यात आलाय.मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आज पहाटेपर्यंत एसटी कामगार संघटनेची बैठक सुरू होती. बरीच चर्चा झाल्यावर अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्चस्तरीय समिती तयार केली जाणार आहे, तसंच अंतरिम वाढ देण्याबाबतचा निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत घ्यावा, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

संप मिटला असला तरी आज एसटी डेपो आणि थांब्यांवर अलोट गर्दी होणार हे नक्की. आज भाऊबिजेचा दिवस आहे.दिवाळीतल्या दिवसांमध्ये सर्वात जास्त प्रवास आजच्या दिवशी घडतो. त्यामुळे संप मिटला असूनही प्रवासात अडचण येणार हे निश्चित.

हा संप बेकायदेशीर आहे, त्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. एसटीचा संप जनतेशी निगडित असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी अद्याप समिती का नेमली नाही? असा सवाल न्या. संदीप शिंदे यांनी यावेळी सरकारला केला. त्यावर सरकारने तत्काळ चार सदस्यीय समिती नेमण्याची तयारी दर्शवली. मात्र यास कामगार संघटना तयार नव्हत्या. सरकारने अंतरिम वेतनवाढ द्यावी. तसे आश्वासन सरकारने दिल्यास संप मागे घेऊ, अशी भूमिका संघटनेने उच्च न्यायालयात घेतली. मात्र सरकारने त्यांची अट मान्य करण्यास नकार दिला.

मुंबई उच्च न्यायालयानं उच्चस्तरीय कमिटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कमिटीने 15 नोव्हेंबरपर्यंत एसटी कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेण्याचंही न्यायालयानं सूचवले आहे.   तसेच 22 डिसेंबरपर्यंत संपूर्ण वेतनवाढीचा निर्णय घेऊन त्यासंबंधी माहिती न्यायालयात देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

First published: October 21, 2017, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading