मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ST Strike: आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी, आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

ST Strike: आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी, आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Protester ST employee died in Nanded: एसटी आंदोलना दरम्यान भोवळ येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Protester ST employee died in Nanded: एसटी आंदोलना दरम्यान भोवळ येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Protester ST employee died in Nanded: एसटी आंदोलना दरम्यान भोवळ येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

नांदेड, 3 डिसेंबर : एसटी महामंडळाचे (ST Mahamandal) विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST employees strike) सुरू केलं. हे आंदोलन सुरू असताना नांदेड येथील एका एसटी कर्मचाऱ्याला बोवळ आल्याने तो आंदोलनस्थळी पडला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा आज मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी मृतदेह बस स्थानकात आणून ठेवला. (Nanded protester ST employee died)

50 वर्षीय दिलीप वीर हे नांदेड आगारात वाहक पदावर कार्यरत होते. नांदेडमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काल दिलीप वीर यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. पण ते हजर झाले नाही. आपल्याला देखील आता निलंबित केले जाईल या तणावात ते होते. कुटुंबातील लोकांना देखील त्यांनी याबाबत सांगितले होते. गेल्या अनेक दिवसापासून ते तणावात होते.

वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

त्यांना दोन मुलं दोन मुली आहेत. मागील दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने आर्थिक परिस्थिती देखील गंभीर बनली होती. दरम्यान काल ते बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी ते आले. सायंकाळी अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. आंदोलनस्थळावरून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सूरु असतांना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

ही बातमी येताच बसस्थानकात मोठ्या संख्येने कर्मचारी जमले. मयत दिलीप वीर यांचा मृतदेह बस स्थानकात आणून ठेवण्यात आला. या ठिकाणी राज्य शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने विलीनीकरणाची मागणी मान्य करावी. मयत दिलीप वीर यांच्या कुटुंबाला तातडीने पन्नास लाख रुवयांची रोख मदत करावी. जोपर्यत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवनार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. नांदेडमध्ये अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी बसेस पूर्णपणे बंद आहेत. नांदेड आगारात जवळपास 300 जणांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे अनेक जण तणावात आहेत.

वाचा : एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला पगाराबरोबरच Incentive मिळणार

संपकरी ST कर्मचाऱ्यांविरोधात सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

सरकारने पगारवाढ करण्याचं जाहीर केलं. मात्र, असे असले तरी अनेक कर्मचारी अद्यापही विलिगीकरणाची मागणी लावून धरत संपावर ठाम आहेत. सरकारकडून वारंवार कामावर हजर होण्याचे आवाहन करुनही एसटी कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने आता राज्य सरकारकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.

मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी अधिकाऱ्यांची बैठक होत असून या बैठकीत मेस्मा कायदा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. सुमारे 9 हजार कर्मचाऱ्यां-यांचे निलंबन आणि सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई करूनही संप मागे घेतला जात नसल्यानं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लावण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Nanded, ST, Strike