मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रात्री झोपायला गेले ते परत आलेच नाही, ST कर्मचाऱ्याने घेतला गळफास

रात्री झोपायला गेले ते परत आलेच नाही, ST कर्मचाऱ्याने घेतला गळफास

 सदावर्ते मागील दोन महिन्यांपासून संपात सहभागी होते. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने तसंच नोकरीचं काय होईल या चिंतेत ...

सदावर्ते मागील दोन महिन्यांपासून संपात सहभागी होते. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने तसंच नोकरीचं काय होईल या चिंतेत ...

सदावर्ते मागील दोन महिन्यांपासून संपात सहभागी होते. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने तसंच नोकरीचं काय होईल या चिंतेत ...

नांदेड, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एकीकडे कर्मचारी संपावर (st bus strike) ठाम आहे. तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या (ST employee commits suicid) सत्र सुरूच आहे. नांदेडमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्याने केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. नांदेडमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.भिमराव सदावर्ते (वय 57) असं या आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदावर्ते यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. भीमराव सदावर्ते हे नांदेडमधील किनवट आगारात वाहक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होते. शहरातील वसरणी भागाचे रहिवाशी होते. शनिवारी रात्री सदावर्ते यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केलं. त्यानंतर झोपण्यासाठी ते 2 बाजूला असलेल्या कच्या विटाच्या  खोलीत गेले. सकाळी ते न आल्याने त्यांच्या मुलाने त्यांचा खोलीचा दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने विटा काढून त्याने पाहिले तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत  आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा - नाना पटोलेंचा महाविकास आघाडी सरकारला थेट घरचा आहेर, म्हणाले....) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदावर्ते यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. सदावर्ते मागील दोन महिन्यांपासून संपात सहभागी होते. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने तसंच नोकरीचं काय होईल या चिंतेत त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.  याबद्दल मृत सदावर्ते यांच्या मुलाने तशी तक्रार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, आता तरी सरकारने दखल घ्यावी आणि विलीनीकरणाची मागणी पूर्ण करावी अशी भावना शहरातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. 'एसटी विलीनीकरणाचं डोक्यातून काढून टाका' दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये निवेदन सादर केले होते. 'प्रत्येकाने विलीनीकरणाचा हट्ट केला तर हे शक्य नाही. पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की. पगाराची हमी आम्ही घेतली आहे. 10 तारखेच्या आत पगार मिळणार आहे. कॉलेज सुरू झालंय, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, असं म्हणत अजित पवार यांनी विलीनीकरणाच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या