— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2021मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव येथे आलेल्या पुरात बस वाहून गेली. या बसमध्ये 4 ते 6 प्रवासी प्रवास करत होते. त्या पैकी एका प्रवाशाचा मृतदेह सापडला आहे. तर दोघांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली. घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्याप एसटी चालक आणि एसटी वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाहीये. गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची (Cyclone Gulab) तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts of Maharashtra) तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts) पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई सिंधुदुर्ग नंदुरबार पुणे अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Yavatmal