धुळे, 23 नोव्हेंबर: धुळे (Dhule) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) याठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका बसचालकाचा उपचारासाठी पैसे नसल्याने (not having money for treatment) दुर्दैवी अंत (Bus driver death) झाला आहे. संबंधित एसटी कर्मचारी रविवारी दुपारपर्यंत पाचोरा आगारात सुरू असलेल्या संपात सहभागी झाले होते. दरम्यान रविवारी 12 च्या सुमारास त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांनी घर गाठलं. पण उपचारासाठी पैसे नसल्याने ते वेळेवर रुग्णालयात जाऊ शकले नाहीत. उपचारात विलंब झाल्याने संबंधित बस चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलीप तुकाराम महाजन असं मृत पावलेल्या 47 वर्षीय एसटी चालकाचं नाव आहे. ते पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात दिली महाजन देखील सहभागी झाले होते. दरम्यान संप सुरू असतानाच रविवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे ते आपल्या घरी नगरदेवळा याठिकाणी आले.
हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...
छातीत असह्य वेदना होत असूनही पैसे नसल्याने त्यांना रुग्णालयात जाता येत नव्हतं. यामुळे ते आपल्या पत्नीला घेऊन कन्नड तालुक्यातील नागद याठिकाणी आपल्या सासुरवाडीला गेले. येथे गेल्यानंतर उपचारासाठी त्यांना चाळीसगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांची ढासळणारी प्रकृती पाहता त्यांना धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाईकांनी तातडीनं त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
हेही वाचा- औरंगाबादेत युवक युवतीचा भयावह शेवट; एकाच झाडाला गळफास घेत संपवलं जीवन
पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याठिकाणी उपचार सुरू असताना, सोमवारी पहाटे बसचालक महाजन यांची प्राणज्योत मालवली आहे. पैसे नसल्याने उपचारात विलंब झाल्याने महाजन यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhule