Home /News /maharashtra /

सटाण्याजवळ एसटीला भीषण अपघात, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एसटी द्राक्षेच्या बागेत घुसली

सटाण्याजवळ एसटीला भीषण अपघात, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एसटी द्राक्षेच्या बागेत घुसली

कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी प्रवाशांना धक्का बसला आहे. एसटीचं आणि द्राक्षेच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे.

  सटाणा, 05 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरात अपघाताचं प्रमाण वाढतचं चाललं आहे. विंचूरप्रकाशा महामार्गावर एसटीला नुकताच अपघात झाला आहे. ही एसटी सटाणा येथून तळवाडे गावाकडे जात होती. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं एसटी थेट द्राक्षेच्या बागेत जाऊन धडकली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटीचं आणि द्राक्षेच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे. मिळालेली माहिती अशी की, ही एसटी सटाणा येथून तळवाडे या गावाकडे जात होती. विंचूरप्रकाशा महामार्गावरून जात असताना या एसटीला भीषण अपघात झाला. यावेळी एसटी भरधाव वेगात होती. अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही एसटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका द्राक्षेच्या बागेत शिरली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. त्यांच्यावर प्रथमोपचार केला आहे. ही एसटी ज्या द्राक्षेच्या बागेत शिरली होती. त्या बागेची प्रचंड नासधूस झाली आहे. यावेळी बागेच्या आधारासाठी उभं करण्यात आलेल्या कंपाउंडचही प्रचंड नुकसान झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजानिक आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात दररोज सुमारे 34 हजार लोकांचा मृत्यू रस्ते अपघातामुळं होतो. तर तब्बल 1 करोड लोकांना इजा होते किंवा त्यांना अपंगत्व येते. रस्‍त्‍यांवर लहान मुलं, वयोवृद्ध आणि सायकल चालवणाऱ्या लोकांना सर्वात जास्त धोका असल्याचं संबंधित संशोधनातून समोर आलं आहे. देशातील विविध स्वयंसेवी संघटना आणि सरकार अपघात टाळण्‍याकरिता अनेक वर्णनात्मक सुचना तयार करत आहे. ज्‍यामध्ये हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना सिट बेल्‍ट लावणे, मद्यपान करून गाडी न चालवणे, भरधाव वेगानं गाडी न चालवणे आदी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: ST

  पुढील बातम्या