Home /News /maharashtra /

एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, जेसीबीच्या मदतीने ड्रायव्हरला काढले बाहेर!

एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, जेसीबीच्या मदतीने ड्रायव्हरला काढले बाहेर!

हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचा समोरच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात ट्रकच्याही समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

धुळे, 07 डिसेंबर :  धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री नंदुरबार महामार्गावरील जैताणेजवळ एसटी बस व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बसमधील 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना निजामपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास  एसटी बसला भीषण अपघात झाला. एसटी महामंडळाच्या पिंपळगाव डेपोची बस नाशिकहून नंदुरबारकडे येत होती.   साक्री नंदुरबार महामार्गावरील जैताणेजवळ पोहोचली असताना अचानक एसटी बस चालकाने नियंत्रण सुटले आणि  नंदुरबारहून साक्रीकडे येणाऱ्या मालवाहतूक ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. मराठी-हिंदीवरून नवरा-बायकोत तूतू-मैंमै; लग्नानंतर 15 दिवसांतच गाठलं पोलीस ठाणे हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचा समोरच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात ट्रकच्याही समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात एसटी बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोन्ही एसटी बस आणि ट्रॅक एकमेकांमध्ये अडकले गेले होते.  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे बोललं जातं आहे. शेतकऱ्याच्या घरात घुसला कंटेनर, अंगणात खेळणाऱ्या दोन मुलींचा करुण अंत अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ त्वरित पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुमारे तासभरात वाहतूक सुरळीत केली. बसमध्ये अडकलेल्या बसचालकाला काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मोठी कसरत करावी लागली. सायंकाळपर्यंत दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने हटविली जाणार असून तात्पुरती वाहतूक सुरळीत केल्याची माहिती एपीआय शिरसाठ यांनी दिली. दरम्यान, जखमींना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय तसंच नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयायत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या