एसटी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक, 3 जण ठार

एसटी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक, 3 जण ठार

नगर-पुणे महामार्गावर जाणाऱ्या रेल्वे पुलावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 26 डिसेंबर : नगर-पुणे महामार्गावर जाणाऱ्या रेल्वे पुलावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले आहे तर  20 ते 22  जण जखमी झाले आहेत.  जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सायंकाळी पुण्याहुन येणारा ट्रक आणि नगरहून पुण्याच्या दिशेने जाणारी बसमध्ये नगरच्या गांधी चौकात चौकाजवळ रेल्वे पुलावर समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर एसटी एका बाजूला कलंडली गेली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या डाव्या बाजूचा भाग कापला गेला.

अपघातानंतर एसटी बसमधून  प्रवाशांनी थेट खाली उड्या मारल्या. त्यामुळे ते जबर जखमी झाले आहे. अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तेथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

अपघातग्रस्त बस ही जामखेड डेपोची आहे.  बसमधल्या अनेकांनी उड्या मारल्या असून ते पुलाच्या खाली पडल्यामुळे जबर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून अनेकांनी हात-पाय गमावले आहेत. गंभीर जखमींची संख्याही जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

धावत्या दुचाकीत ओढणी अडकून नवविवाहितेला भरधाव टेम्पोने चिरडले

दरम्यान, पतीसोबत दुचाकीवरून जात असताना २२ वर्षीय नवविवाहितेची अचानक धावत्या दुचाकीच्या टायरमध्ये ओढणी अडकल्याने ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने तिला चिरडल्याची दुर्दैवी घटना भिवंडीत घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे ही महिला 8 महिन्यांची गरोदर होती.

किर्ती देवेंद्र जाधव ( वय २2) असं मृतक नवविवाहितेचे नाव आहे. भिवंडीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता  येवई - पिसे रोडवरील भावाळे गावानजीकच्या ऑलसेंट इंग्लिश स्कुलसमोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल  करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत किर्ती ही पती देवेंद्र याच्यासोबत चिंचवली येथून भावाच्या  मुलाला कल्याण येथील एका रुग्णालयात पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी पिसे रोडवरील भावाळे गावानजीक असलेल्या ऑलसेंट इंग्लिश स्कुलसमोर धावत्या दुचाकीच्या चाकात तिची ओढणी अडकून पडली होती.

ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या टेम्पो तिच्या अंगावरून जाऊन ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत भिवंडीतील सिराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किर्ती यांचं आठ महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. तसंच ही महिला 8 महिन्याची गरोदर होती. किर्ती यांच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा करून किर्तीचा मृतदेह स्व.उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 26, 2019, 11:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading