मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चालले होते दिव्यांग शिक्षक, एसटी बसच्या धडकेत जागीच ठार

साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चालले होते दिव्यांग शिक्षक, एसटी बसच्या धडकेत जागीच ठार

 बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली.

बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली.

बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली.

  • Published by:  sachin Salve

अमोल गावंडे,प्रतिनिधी

बुलडाणा, 03 डिसेंबर :  साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या दिव्यांग शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे.  बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बुलडाणावरून खामगाव मार्गावर दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पद्माकर भोसले असं मृत शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

खामगाव तालुक्यातील रोहणा गावाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बुलडाण्यावरून खामगाव मार्गे अकोलाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने  समोरून येणाऱ्या दिव्यांगाच्या तीन चाकी मोटरसायकलला  धडक दिली. या अपघातात शिक्षक पद्माकर बोचरे हे जागीच ठार झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दिव्यांग शिक्षकाच्या तीनचाकी दुचाकीचा चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथे हलविले आहे.

शिक्षक बोचरे हे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव राजा येथून रोहणा या गावासाठी निघाले होते. परंतु, वाटेतच्या त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. बोचरे हे साखर विद्यामंदिराच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर; शिक्षक जागीच ठार

दरम्यान, कोल्हापूरमध्ये भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर 7 जण जखमी झाले आहेत. उद्धव सदाशिव पाटील (वय 56, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचं नाव आहे.

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला. त्यानंतर स्थानिकांनी अपघात स्थळावर धाव घेतली. स्थानिकांनी बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र या अपघातात बसमधीलच उद्धव पाटील या शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील अपघातातील जखमींमध्ये कोल्हापूर जिल्हासह काही मुंबईतील रहिवाश्यांचाही समावेश आहे. मधुकर यादव (वय 50, रा. कणेरीवाडी, ता. करवीर), गौरू सुतार (54, रा. सदर बाजार कोल्हापूर), रुपा सुतार (55, रा. मुलुंड, मुंबई), रमेश गुरव (65, रा. मुलुंड, मुंबई), शिवराम चौधरी (26, रा. कागल), चालक हंबीरराव यादव (57, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर), सतीश कुंभार (55, रा. बापट कॅम्प कोल्हापूर) या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First published: