Home /News /maharashtra /

विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 2 जण जागीच ठार

विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 2 जण जागीच ठार

हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला.

पंढरपूर, 17 एप्रिल : श्री विठ्ठलाचे दर्शन (vitthal mandir pandharpur) घेऊन घरी परत जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे.  भरधाव एसटी बस (st bus) आणि आणि कारची (maruti ertiga car accident) समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघातात अपघातात दोन भाविक ठार झाले आहे. तर 4 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंढरपूर सोलापूर रोडवर देगाव परिसरात हा अपघात घडला आहे. सोलापूर येथील एक कुटुंब आणि इतर सदस्य पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला मारूती सुझुकी इर्टिगा (एमएच ११ बीव्ही १९४२) गाडीने आले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्व जण सोलापूरकडे निघाले होते. देगाव परिसरात गाडी पोहोचली असता समोरून येणाऱ्या एसटी बसने कारला जोरात धडक दिली. (लव्ह, सेक्स अँड मर्डर, 19 वर्षीय तरुणासोबत समलैंगिक संबंध ठेवले अन्....) हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या  अपघात दोन जण ठार झाले आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक मिळत आहे. हा अपघात  झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. यामध्ये चार चाकीमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. शिवराज प्रल्हाद भोसले आणि दत्ता रामा भोसले अशी मयतांची नाव आहे. (Android फोनसाठी Google ने बंद केलं हे फीचर, आता कधीच वापरता येणार नाही) तर व्यंकट मारुती भोसले, शरद वसंत भोसले, सुनील किसन भोसले, सचिन किसन कदम, शंकर माधव मोटे अशी जखमींची नाव आहे. सर्व जखमींना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या