ST बसचा भीषण अपघात, 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी

ST बसचा भीषण अपघात, 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी

जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

  • Share this:

नाशिक, 8 मार्च : मुबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. तर जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

चांदवडजवळील रेणुकादेवी मंदिर इथल्या घाटामध्ये एसटी बस उलटली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला, अशी माहिती मिळाली आहे.

अपघातातील जखमींना चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच कुणीही गंभीर जखमी झालं नसल्याची माहिती आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एसटी बसच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. एसटी प्रशासनासाठी ही चिंतेची बाब असून हे अपघात रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

VIDEO : राष्ट्रवादीचं तिकीट आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा, काय म्हणाले उदयनराजे?

First published: March 8, 2019, 9:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading