गाडीचं स्टिअरिंग झालं जाम, ST झाडाला आदळून 20 प्रवासी जखमी

गाडीचं स्टिअरिंग झालं जाम, ST झाडाला आदळून 20 प्रवासी जखमी

एसटीचा अपघात झाला झाल्यानंतर 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्बुलन्सला कॉल लावण्यात आला परंतु तब्बल एक तासापर्यंत एकही ॲम्बुलन्स आली नाही.

  • Share this:

किशोर गोमासे, वाशीम 18 जुलै : एस.टी. महामंडळाच्या एका बसचं स्टिअरिंग अचानक जाम झाल्याने एक मोठा अपघात घडला. ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि बस एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. अशाही परिस्थितीत चालकाने ब्रेक लावून गाडी खोल दरीत कोसळण्यापासून वाचवली.

महांडळाची एम. एच.14 BT 0667 ही बस रिसोडवरून अकोल्याला जात होती. या गाडीचं सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान रिसोड तालुक्यातील बिबखेडा नजीक स्टिअरिंग जाम झालं त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली गेली आणि एका झाडाला जाऊन धडकली. या अपघातात 20  प्रवासी जखमी झाले असून त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. एसटीचा अपघात झाला झाल्यानंतर 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्बुलन्सला कॉल लावण्यात आला परंतु तब्बल एक तासापर्यंत एकही ॲम्बुलन्स न पोचल्याने अखेर दुसऱ्या STबसमधून जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यात आलं. जखमींवर रिसोड तसेच वाशिम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सार्वजनिक वाहतुकीचा फज्जा! खुद्द महापौरांनी बस चालवून तपासली सुरक्षा

पाणी पुरवढा करणाऱ्या विहिरीत टाकलं विष

बीड : जीवघेण्या दुष्काळामुळे मराठवाडा होरपळून निघाला आहे. पावसानंही येथे पाठ फिरवली आहे. स्थानिकांची थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण सुरू आहे. विहिरींनी अक्षरशः तळ गाठलं आहे. पाण्याशिवाय जगायचं तरी कसं? या न सुटणाऱ्या प्रश्नासमोर मराठवाडावासीय हतबल झालेले असताना एका माथेफिरूनं पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतच विष टाकल्याचे संतापजनक वृत्त समोर आले आहे.

मुख्यमंत्री 2 जागांवर लढवणार विधानसभा निवडणूक? 'हा' असेल दुसरा मतदारसंघ

गेवराई तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. भोजगावासह वस्ती, तांड्यांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत अज्ञात माथेफिरूने दोन बाटल्या कीटकनाशक ओतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (18 जुलै) सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या लोकांमुळे हा प्रकार उजेडात आला.

First published: July 18, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading