येवला, 09 नोव्हेंबर : नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढत आहे. एकीकडे रुग्ण रिकव्हर होण्याचा आकडा वाढत असेल तरी धोका अद्याप कमी झालेल्या नाही. त्यातच दिवाळीच्या तोंडावर धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. लालापरी देखील या कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. नाशिकच्या येवला एसटी आगारात एकाचवेळी 16 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
येवला एसटी आगारातील 16 चालक-वाहक कोरोनाच्या विळख्यात सापडले असून त्यांना येवल्याच्या नगरसुलसह इतर वेगवेगळ्या कोविड सेंटर मध्ये क्वांराटाईन करण्यात आले आहे. येवला आगारातील 44 चालक-वाहक याना मुंबईला ड्युटीसाठी पाठवण्यात आलं होतं. तिथून परतल्यावर त्यांचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची झाली लागण झाली असल्याचे निष्पन्न झालं.
हे वाचा-मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी
एकीकडे 3 महिन्या पासून पगार थकले आहेत. तर दुसरीकडे आता ऐन दिवाळीच्या तोंडावर या कामगारांना कोरोनाची लागण झाली आल्याने ते दुहेरी संकटात सापडले आहे. दिवाळीआधी एसटी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकानं दिलासा दिला नसल्यानं आधीच एसटी कर्मचाऱ्यांकडून संताप येत होत आहे.