SSC Supplementary Result 2019 : दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज, इथं करा चेक

SSC Supplementary Result : दहावीची फेरपरीक्षा 17 ते 30 जुलै या कालावधीत घेण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 10:55 AM IST

SSC Supplementary Result 2019 : दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज, इथं करा चेक

मुंबई, 30 ऑगस्ट : महाऱाष्ट्र एसएससी बोर्डाच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने त्यांच्या संकेतस्थळावरून याबाबत अधिकृतपणे जाहीर केलं आहे. संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http://mahresult.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. बोर्डानं 17 ते 30 जुलै या कालावधीत फेरपरीक्षा घेतली होती. तर मुख्य परीक्षेचा निकाल 8 जुन रोजी जाहीर करण्यात आला होता. 23 ऑगस्टला बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लावल्यानंतर दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना त्यांचे पुनर्मुल्यांकन करता येईल. तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल. या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.

राज्यात दहावीचा निकाल 77.10 टक्के इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांची संख्या 12.31 टक्क्यांनी कमी आहे. यावेळीही मुलींनीच बाजी मारली. तर विभागामाध्ये कोकण पुन्हा पहिल्या स्थानीच राहिले. कोकणचा निकाल 88.38 टक्के इतका तर सर्वात कमी 67.27 टक्के नागपूरचा निकाल लागला.

'ऑस्ट्रेलियाचा राजा', लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 10:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...