दहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

दहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.

  • Share this:

14 जून : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे.  91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे.

दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

कसा लागलाय निकाल?

कोकण -96.18 टक्के

कोल्हापूर – 93.59 टक्के

पुणे – 91.95 टक्के

मुंबई – 90.09 टक्के

औरंगाबाद – 88.15 टक्के

नाशिक – 87.76 टक्के

लातूर – 85.22 टक्के

अमरावती – 84.35 टक्के

नागपूर – 83.67 टक्के

दहावीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली. राज्यातून यंदा 17 लाख 66 हजार 198 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिलीये. त्यामध्ये  9 लाख 89 हजार 908 विद्यार्थी, तर 7 लाख 76 हजार 190 विद्यार्थिनींचा समावेश आहे.

राज्यातील एकूण 4 हजार 728 परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या वेबसाइटसोबतच इतर वेबसाइटवरही पाहता येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै 2018 मध्ये फेरपरीक्षा होणार आहे.

दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल वेबसाईटवर पाहता येईल.

या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल :

http://www.mahresult.nic.in/

http://result.mkcl.org/

http://mh-ssc.ac.in/Home.aspx

http://m.rediff.com/exam_results

First published: June 13, 2017, 9:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading