• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • SSC HSC Board Supplementary Exam Result: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज; येथे चेक करा RESULT

SSC HSC Board Supplementary Exam Result: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज; येथे चेक करा RESULT

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 • Share this:
  पुणे, 20 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) (ssc october exam result 2021) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल (hsc october exam result 2021) आज बुधवारी 20 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर संबंधित निकाल जाहीर करण्यात आहे. येथे विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. हेही वाचा-शाळेतील परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा; ही ट्रिक वापरुन सोडवा गणितं सदर परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेत स्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयातील गुणांची गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. हेही वाचा-Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त त्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इयत्ता दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: