दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं, असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

पुणे, 22 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC-HSC Exam Board Maharashtra) 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं, असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा...दहावी-बारावीच्या परीक्षा कधी? व्हायरल होणाऱ्या मेसेजनंतर CBSE कडून स्पष्टीकरण

नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं सरळ डेटा बेसमध्ये 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांना 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील.

दरम्यान, राज्यात कोविड-19 संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यामुळे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आले होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून परीक्षा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही परीक्षा मंडळानं सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची  शक्यताही नाकारता येत नाही. याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली होती.

हेही वाचा...'लागिरं झालं जी...' साताऱ्याच्या 'अज्या'ने आणली काश्मिरी सून!

कोरोनानाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या 12 वीच्या परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकरण्यात येतील यावर सरकारचा विचार सुरू आहे. 12 वीच्या एप्रिलमध्ये आणि मे महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यावर विचार सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 22, 2020, 3:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या