मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"दहावीत 100 पैकी 100 ,पहिला माझा नंबर', डोंबिवलीकर विद्यार्थिनींची कामगिरी

"दहावीत 100 पैकी 100 ,पहिला माझा नंबर', डोंबिवलीकर विद्यार्थिनींची कामगिरी

डोंबिवली, 08 जून : राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेण्याचा पराक्रम डोंबिवलीच्या दोन विद्यार्थिनींनी गाजवून दाखवलाय.

डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रुतिका जगदीश महाजन हिने 100 टक्के गुण मिळवले आहेत.  डोंबिवलीमध्ये 100 टक्के गुण मिळवणारी ही पहिलीच मुलगी ठरली आहे.श्रुतिकाला इंग्रजीत 89, संस्कृत 99, मराठी 92 तर इतर तिन्ही विषयात प्रत्येकी 98 गूण मिळाले आहे. 500 पैकी 485 आणि 15 गूण हे क्रीडा आणि अतिरिक्त कलेसाठी गूण मिळाले.  श्रुतिकाने याचे श्रेय शाळेला आणि पालकांना दिले आहे.

तर दुसरी विद्यार्थिंनी ही टिकळनगर शाळेतील आहे.  रिद्धी प्रवीण करकरे असं या विद्यार्थिनींचं नाव असून तिलाही दहावीत 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. रिद्धीला मराठीत 94, संस्कृतमध्ये 99, गणित 98, इतिहास आणि नागरिकशास्त्रमध्ये 98 गूण मिळाले आहे. रिद्धीलाही 500 पैकी 485 आणि 15 गूण हे क्रीडा आणि अतिरिक्त कलेसाठी गूण मिळाले.

रत्नागिरीतल्या डेरवण येथील JVJCT स्कुलच्या वेद पटेल याला सुद्धा 100 टक्के गूण मिळाले आहे. वेदला एकूण 500 पैकी 481 तर क्रीडाचे 19 असे मिळून एकूण 500 मार्क्स मिळाले आहेत. वेदच्या या यशामुळे त्याच्यावर शिक्षक तसंच पालक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: 10 th exam, Dombivali, SSC exam 2018, दहावीची परीक्षा