मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सहानुभूती नको, शिक्षणाचा हक्क द्या! फक्त मोठ्या अक्षरातल्या प्रश्नपत्रिकेसाठी 10वीच्या विद्यार्थिनीला करावा लागतोय संघर्ष

सहानुभूती नको, शिक्षणाचा हक्क द्या! फक्त मोठ्या अक्षरातल्या प्रश्नपत्रिकेसाठी 10वीच्या विद्यार्थिनीला करावा लागतोय संघर्ष

75 टक्के अंध आणि सेरेब्रल पाल्सी आजाराशी टक्कर घेत दहावीच्या परीक्षेला सामोरी जाणाऱ्या या स्वाभिमानी विद्यार्थिनीची एकच मागणी आहे की मला शासनाच्या नियमानुसार मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिका द्या! पण...

75 टक्के अंध आणि सेरेब्रल पाल्सी आजाराशी टक्कर घेत दहावीच्या परीक्षेला सामोरी जाणाऱ्या या स्वाभिमानी विद्यार्थिनीची एकच मागणी आहे की मला शासनाच्या नियमानुसार मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिका द्या! पण...

75 टक्के अंध आणि सेरेब्रल पाल्सी आजाराशी टक्कर घेत दहावीच्या परीक्षेला सामोरी जाणाऱ्या या स्वाभिमानी विद्यार्थिनीची एकच मागणी आहे की मला शासनाच्या नियमानुसार मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिका द्या! पण...

सिंधुदुर्ग, 12 फेब्रुवारी : ही कहाणी आहे एक विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी सुरु केलेल्या राज्यातल्या अनागोंदी शिक्षण व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची. 75 टक्के अंध आणि सेरेब्रल पाल्सी या आजारांशी टक्कर घेत दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या या स्वाभिमानी विद्यार्थिनीची एकच मागणी आहे की मला शासनाच्या नियमानुसार मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिका द्या ! पण शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यानी तिचा हा हक्क नाकारत तिच्यासारख्या राज्यातल्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं स्वप्न धुळीला मिळवलय .

काय आहे श्रुतीची कहाणी

श्रुती दीपक पाटील वेंगुर्ले हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकते आहे. श्रुती 75 टक्के अंध आहे . सेरेब्रल पालसी या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराने तिला 60 टक्के ग्रासलं आहे. तरीही इतर मुलांसोबत तिची शिकण्याची जिद्द अनेक दिव्यांगांना प्रेरणा देणारी आहे ! 3 मार्चला होणारी दहावीची परीक्षा तिलाही द्यायचीय . तिची एकच मागणी आहे की मायबाप सरकार, मला नीट दिसत नसल्यामुळे शासनाच्याच नियमानुसार मला मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिका द्या!

श्रुती आणि तिच्या पालकांची मागणी सरकारनेच दिव्यांग व्यक्तींचा अधिकारांतर्गत काढलेल्या 16 ऑक्टोबर 2018 च्या GR नुसार आहे. यामध्ये अंशत: अंध विद्यार्थ्याना Arial 20 साईझच्या फाँटमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात असा नियम आहे . यासाठी श्रुतीच्या वडिलांनी कोकण बोर्ड, माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, शिक्षण सचिव, लोकप्रतिनिधी या सगळ्यांचे उंबरठे झिजवले पण श्रुतीला मोठ्या फाँटमधली प्रश्नपत्रिका नाकारण्यात आली. इतकंच काय तर श्रुतीला आठवीपासून मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या वेंगुर्ले हायस्कूलच्या मुख्याध्यापकानीही शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला पण त्यानाही शिक्षण विभागाचा नकार आलाय.

खरं तर जी आर झाल्यापासून तीन वर्षे झाली अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यावर्षीची 3 मार्च ला होणारी दहावीची परीक्षा हा GR आल्यानंतरची चौथी परिक्षा आहे ज्यात अशा दिव्यांगांचा हक्क डावलला गेलाय .

राज्यातल्या अनेक दिव्यांगांची शिक्षणाची वाट बिकट

केवळ श्रुतीच नाही तर अपघाताने अंशत: अंधत्व आलेली पूर्वाही याच हायस्कूल मध्ये यंदा नववीत आहे. ती पुढच्या वर्षी दहावीची परीक्षा देणार आहे . तिच्याही पालकांची हीच मागणी आहे . श्रुतीची आई रुपाली पाटील आता याविरोधात उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या मते "हा केवळ श्रुतीचा प्रश्न नाही . तर राज्यात असे अनेक दिव्यांग आहेत की जे स्वतःचा पेपर स्वतः लिहू शकतात. लेखनिक घेऊन त्यांना वेगळ्या प्रकारे लिहायची गरज नाही. दहावी बारावीच्या परीक्षेत त्यांच्या कुवतीनुसार त्यांच्या स्वाभिमानानुसार त्याना पुढे जाऊ दे. माझ्या मुलीचा अनुभव असा आहे की, ती स्वाभिमानाने जगायचा प्रयत्न करतेय तिला मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका मिळावी जेणेकरुन राज्यातल्या दहावी बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल."

श्रुतीला वकील व्हायचय. तिला सहानुभूती नको तर तिचा हक्क हवाय. तिच्यासारख्या अनेक जिद्दी दिव्यांगांना स्वत:ला सिध्द करुन दाखवायचय. पण सरकारी बाबूंचा कामचुकारपणा या दिव्यांगांच्या स्वप्नांचा चुराडा करतोय.

First published:
top videos