कल्याण, 25 जून : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 12 जून ते 25 जून या कालावधीत तब्बल कोरोनाचे 3177 रुग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 96 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा लॉकडाऊन घेऊन तो कडक करावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे केडीएमसी मधील कटेन्मेंट झोनमधील सर्व ठिकाणे सील करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. तसंच लॉकडाऊन कडक करण्यासाठी एसआरपीएफची मदत घेण्यासाठी आम्ही विचारधीन आहोत, असे कल्याण डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले.
दुसरीकडे, फक्त कंटेंन्मेट झोन सील करून विशेष काही फरक पडणार नाही, संपूर्ण पालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन घेतला तरंच फरक पडेल, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना आजाराचे रूग्ण वाढत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येमुळे रूग्णांना रूग्णालय सुविधा पुरवणेही शक्य होत नसल्याने काही रूग्णांचा मृत्यू होत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याचा सर्वाधिक वाईट परिणाम कल्याण डोंबिवलीकरांवर झाला व येथे कोरोना आजारात झपाट्याने वाढ झाली आहे.
यामुळे या सध्या "जे वाचलेत त्यांना वाचवा " या मोहीमेंतर्गत शहरातील संस्थांनी आयुक्तांकडे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. शिवनलिनी प्रतिष्ठान, आधार फाऊंडेशन, आयकॉन प्रतिष्ठान, फक्त राजे प्रतिष्ठान, हेल्पिंग हँड, सहयोग फाऊंडेशन यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे. तर केडीएमसी मधील कंटेंटमेंन झोनमधील सर्व ठिकाणे कडक सील करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊन कडक करण्यासाठी एसआरपीएफची मदत घेण्यासाठी आम्ही विचारधीन आहोत असे कल्याण डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले. त्यामुळे आता नक्की काय निर्णय घेतला जातो हे पाहावे लागेल.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या :
12 जून ते 19 जून - 1315
20 जून - 243
21 जून - 254
22 जून - 256
23 जून - 202
24 जून - 226
25 जून - 323
26 जून - 358
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kalyan dombivali, Kalyan dombivali municipal corporation