जय वाघाचा बछडा 'श्रीनिवासन'ही गेला, विजेच्या धक्क्याने मृत्यू

जय वाघाचा बछडा 'श्रीनिवासन'ही गेला, विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेताच्या कुंपनाला सोडलेल्या विजेच्या धक्क्याने श्रीनिवासनचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

  • Share this:

26 एप्रिल : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवास वाघाचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. शेताच्या कुंपनाला सोडलेल्या विजेच्या धक्क्याने श्रीनिवासनचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला जय वाघाचा तीन वर्षांचा बछडा "श्रीनिवास" उमरेड करंडला अभयारण्यातून बेपत्ता झाला होता. नागभीड तालुक्यात मसली इथं डुकरासाठी शेताच्या कुंपनाला सोडलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर शेतक-याने मृतदेह जमिनीत पुरल्याचे उघड झालंय.

पण त्याचा मृत्यू संशयास्पद वाटतोय. कारण या शेतकऱ्यानं असा दावा केलाय की विजेच्या तारेच्या धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यानं वाघाचा मृतदेह लगेच पुरलाही. पोलीस किंवा वन विभागाला त्यानं कळवलंही नाही. याच कारणानं दोन जणांना वन विभागानं ताब्यात घेतलंय. मात्र, वन विभागानं यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

(फोटो साभार मयुर वाघमारे)

 

First published: April 27, 2017, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading