मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

क्रीडा शिक्षक पदवी परीक्षेकरता फिल्ड टेस्टचा अट्टाहास कशासाठी?

क्रीडा शिक्षक पदवी परीक्षेकरता फिल्ड टेस्टचा अट्टाहास कशासाठी?

पुणे, 27 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा ऑनलाईन (online) होत असताना BPED, MPED अर्थात क्रीडा शिक्षक पदवी आणि पद्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत्या 29 ऑक्टोबरला लेखी परीक्षा (CET exam) घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान शारीरिक क्षमता चाचणी अर्थात फील्ड टेस्टही घेण्यात येणार आहे. मात्र,  फील्ड टेस्टला राज्यभरातील परीक्षार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. सराव नसल्यानं शारीरिक क्षमता चाचणी दिल्यास आरोग्या धोका निर्माण होऊ शकतो, असंही विद्यार्थ्यांनी 'News 18  लोकमत'शी बोलताना सांगितलं. कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असताना ही परीक्षा ऑनलाईन का नाही, असाही सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स संस्थेनं (NIS) देखील परीक्षा ऑनलाईन घेतली, मग महाराष्ट्र सरकारला वावडं का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवसेना दसरा मेळावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा कार्यक्रम 50 माणसांमध्ये झाला. मग या परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थी एकाच ठिकाणी कसे जमणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पुण्यात 800 विद्यार्थी क्रीडा शिक्षकाच्या परीक्षेस पात्र ठरले आहेत. हेही वाचा...भाजप नगरसेवकाची हत्या करून पसार झालेला छोटा राजनचा हस्तक नाशिकमध्ये जेरबंद राज्यातील विविध केंद्रांवर क्रीडा शिक्षक पदवी आणि पद्युत्तर अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. राज्यात जवळपास 8000 विद्यार्थी BPED तर 2000 विद्यार्थी हे MPEDच्या लेखी परीक्षेला पात्र ठरले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे विद्यार्थी देशभरात विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. एक तर गेले 7 महिने मैदाने, व्यायाम शाळा बंद होत्या. त्यामुळे परीक्षार्थ्यांचा सराव नाही आहे. त्यात परीक्षेसाठी आता आता विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, जळगाव, सोलापूर यापैकी निवडलेल्या केंद्रावर पोहोचावं लागणार आहे. विद्यार्थ्यांनी सांगितलं की, 100 विद्यार्थ्यांचे 10 तज्ज्ञांनी ऑनलाइन टेस्ट घेतली तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या साठी फक्त पाच मिनिट वेळ लागेल. विद्यार्थ्याने जर plank hold, wall sit, sit ups push ups, यासारख्या टेस्ट ते घरूनही देऊ शकतात. जर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील दोनच युनिटवर अंतिम परीक्षा होऊन डिग्री मिळू शकते. खालच्या वर्गातील विद्यार्थी परीक्षा न देता मागील परीक्षांच्या आधारांवर इंटरनल मार्कांच्या आधारावर जाऊ शकतो वरच्या वर्गात फर्स्ट ईयरचा सेकंडमध्ये आणि सेकंड ईयरचा थर्डमध्ये जाऊ शकतो. व सगळ्याच गोष्टीत सोपी माध्यमे वापरली जाऊ शकतात. तर एन्ट्रन्स टेस्ट मागील ठरलेल्या नियोजित पद्धतीने घेणे कितपत योग्य आहे? त्यामध्ये बदल का केला जात नाही. यापूर्वी देखील ॲडमिशन या सीईटीशिवाय झालेल्या आहेत. मग विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा प्राधान्यक्रम विचारून त्यानुसार महाविद्यालयाला त्यांची एन्ट्रन्स टेस्ट घेण्याची परवानगी का दिली जाऊ नये? किंवा NIS प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेऊन महाविद्यालय सुरू होईल तेव्हा जर ते फिट नसतील तर त्यांचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही असे लिहून घेणे योग्य ठरणार नाही का? तसेच मराठा आरक्षण हा मुद्दा या प्रवेशाला लागू होत असताना CETचा रिझल्ट लगेच लागून महाविद्यालय त्वरित सुरू होणार आहेत काय? जर असे नसेल तर आईन सणाच्या वेळी विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्यास सांगण्यात येत आहे. की ज्यामुळे परत जाताना त्यांना प्रवासाच्या गर्दीशी सामना करावा लागेल. सर्क्युलर मध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व गोष्टी सनी टाईप करून टेस्ट घेण्यासाठी मैदानावर विद्यार्थी तसेच तज्ञ वर्ग यांचा जास्तीत जास्त वेळ संपर्क येऊन तज्ञांना देखील या गोष्टीचे मुळे करुणा चा धोका आहेच. त्याच बरोबर प्रत्येक तेच साठी असिस्टंट लागत असल्याने अनेक लोकांना यामध्ये सहभागी करावे लागते. हेही वाचा..."15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला माझा मुलगा", डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा फिल्ड टेस्ट याचा अर्थ विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक क्षमता पणाला लावून आपण वरचढ आहोत, हे सिद्ध करणे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना गेले आठ महिने कोणत्याही प्रकारचा मैदानी व्यायाम करण्याची परवानगी नव्हती त्यांना अचानक मैदानावर आपण फिट तंदुरुस्त आहोत हे सिद्ध करण्यासाठी आव्हान पेलायचे आहे. व्यायाम करताना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यास कोण जबाबदार?  तोंडाला मास्क लावून फिटनेस टेस्ट योग्य आहे काय? पुणे विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा 26 ते 29 तारखेपर्यंत आहे. विद्यार्थ्याने सिईटी दिली तर त्यांचा 29 तारखेचा पेपर नंतर घेण्यात येईल, असं पुणे विद्यापीठाने सांगितले. परंतु सीईटीला वेळेवर उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवास करून यावयाचे असल्यास त्याला रस्त्यात ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे तो आधीच सीईटीसाठी इतर राज्यातून येण्याशिवाय त्याला पर्याय नाही. ऑनलाइन परीक्षा हे एक आव्हान समोर असताना स्वतःच्या राहण्याची तसेच खाण्यापिण्याची सोय व त्यासाठी पुण्यात येऊन इतरांच्या संपर्कात येणे हे अनिवार्य असणार आहे. तसेच राहण्याची सोय नसल्यास स्वतःला शक्य नसले तरी विद्यार्थ्याला अनावश्यक भुर्दंड बसणार आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus symptoms

पुढील बातम्या