कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला अटक

कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला अटक

विजय मनुगडे असं या शिक्षकाचं नाव असून या शिक्षकास आज पहाटे कोल्हापूर शहरातूनच अटक करण्यात आली आहे

  • Share this:

18 आॅगस्ट : कोल्हापूरातील कोल्हापूर पब्लिक स्कुल या शाळेतील चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडा शिक्षकला अटक करण्यात आलीय. विजय मनुगडे असं या शिक्षकाचं नाव असून या शिक्षकास आज  पहाटे कोल्हापूर शहरातूनच अटक करण्यात आली आहे

हॉकी प्रशिक्षणादरम्यान विजय मनुगडे या नराधम शिक्षकाने हे कृत्य केलंय. मॉलिश करण्याच्या आणि शॉर्ट खरेदी करण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने मुलींशी लगट केली होती. एवढंच नाही तर शाळेमध्येच एका मुलीशी त्याने 2 ते 3 वेळा गैरकृत्यही केलं होतं.

मे महिन्यापासून हा शिक्षक हे कृत्य करत होता. मात्र दबावातून आणि घाबरून मुलींनी याबाबत वाच्यता केली नव्हती. मात्र या नराधम शिक्षकाचा अधिकच त्रास झाल्याची तक्रार अखेर या चारही मुलींनी पोलिसांत दाखल केलीय. या प्रकरणी मनुगडे याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

First published: August 18, 2017, 11:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading