Home /News /maharashtra /

मविआ सरकार कोमात अन् काँग्रेसच्या मंत्र्याने पंजाबी गाण्यावर ठेका धरला जोमात, VIDEO

मविआ सरकार कोमात अन् काँग्रेसच्या मंत्र्याने पंजाबी गाण्यावर ठेका धरला जोमात, VIDEO

यावेळी सुनिल केदार यांचा अवतार पाहून उपस्थितीत आयोजक आणि तरुण मंडळी अवाक् झाली.

यावेळी सुनिल केदार यांचा अवतार पाहून उपस्थितीत आयोजक आणि तरुण मंडळी अवाक् झाली.

यावेळी सुनिल केदार यांचा अवतार पाहून उपस्थितीत आयोजक आणि तरुण मंडळी अवाक् झाली.

    मुंबई, 26 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे  महाविकास आघाडी सरकारवर (mva government) अस्थिरतेच ढग निर्माण झाले आहे. तिन्ही पक्षाचे नेते बैठकांवर बैठका घेऊन तोडगा काढण्यास प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार (sunil keadar) यांनी पंजाबी गाण्यावर भांगडा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूरमध्ये  टाईम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाईम्स समुहा तर्फे आयोजित "हॅपी स्ट्रीट" या उपक्रमाला आज सुनील केदार यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर सुनील केदार उपस्थितीत होते. त्यावेळी एक पंजाबी गाणं लावण्यात आलं. एक तरुण पंजाबी गाण्यावर मस्त पैकी भांगडा करत होता, त्याने सुनील केदार यांना  डान्स करण्यास विनंती केली. सुरुवातीला सुनील केदार यांनी नकार दिला. पण, तरुणाने आग्रह केल्यामुळे सुनील केदार यांनाही भांगडा करण्याचा मोह सुटला नाही. मग काय सुनील केदार यांनी दोन्ही हात हवेत भिरकावले आणि तरुणासोबत भांगडा केला. यावेळी  सुनिल केदार यांचा अवतार पाहून उपस्थितीत आयोजक आणि तरुण मंडळी अवाक् झाली. आयोजकांनी सुनील केदार यांच्यासोबत ठेका धरला. दरम्यान, आरोग्याप्रती नागपूर शहरातील युवा पिढीचा आत्मविश्वास व जोश हा कौतुकास्पद आहे, असं मत सुनील केदार यांनी व्यक्त केलं. सुनील केदार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुद्ध केदार यांनीच हा व्हिडीओ आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरही शेअर केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या