राज्यात ठिकठिकाणी भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद, शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर

राज्यात ठिकठिकाणी भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद, शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर

महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुणे, जालना,नाशिक, नागपूरमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

  • Share this:

पुणे, 08 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुणे, जालना,नाशिक, नागपूरमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत आंदोलन करत आहे.

पुण्यात भारत बंद काही प्रमाणात पाळला जात आहे. मार्केट यार्ड सुरू असलं तरी फक्त भाजीपाला विभाग सुरू आहे. कांदा बटाटा आणि भुसार माल विभाग बंद राहणार आहे. तसंच सकाळी अकरा वाजता शहरातील अलका चौकातून महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात व्यापारीही सहभागी होणार आहेत. दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.

जालन्यात मोफत दूध वाटून स्वाभिमानीकडून भारत बंदला पाठिंबा

दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून पाठिंबा देण्यात आला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेने सुरू आहे. या आंदोलनास महाराष्ट्रातूनही शांततेत सहभागी होण्याचे आव्हान राजू शेट्टी यांनी केले होते. त्यामुळे या आंदोलनाला कुठलाही गालबोट न लावता, कुठे ही अनुचित प्रकार न करता आणि शेतमालाचा नुकसान न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आलंय.

तर नाशिकमध्ये भारत बंदमध्ये लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे लिलाव बंद असल्याने बाजार समित्यात  शुकशुकाट पसरला आहे.

 वंचित आघाडीचाही पाठिंबा

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारत बंदला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीचा भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. आजच्या 'भारत बंद'ला 'आप'नेही पाठिंबा दिला असून बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हा बंद शांतीपूर्णपणे यशस्वी करण्याचे काम करणार आहे.  नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात शिख बांधव निदर्शनं करणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 8, 2020, 8:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या