Home /News /maharashtra /

PHOTOS: धुळ्यात लग्नासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भरधाव कार विहिरीत कोसळून चौघांचा मृत्यू

PHOTOS: धुळ्यात लग्नासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भरधाव कार विहिरीत कोसळून चौघांचा मृत्यू

धुळ्यात भरधाव कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

धुळे, 7 मे: धुळे जिल्ह्यातील दिघावे गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात (Car Accident in Dhule) 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. साक्री तालुक्यातील दिघावे गावाजवळील ही घटना घडली असून गाडीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू (4 Passengers died) झाला आहे. कासारे दिघावे रस्त्याने एक कार जात असताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली (Car fall down in well). या मारुती कारमध्ये पाच प्रवासी होते. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानिमित्ताने कारने जात असलेल्या परिवारावर काळाने घाला घातलाय. दिघावे फाट्याशेजारील विहिरी न दिसल्याने भरधाव जाणारी कार थेट विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला तर तर एकाचा जीव वाचला आहे. सटाणा येथील रहिवाशी असलेले शंकर यादवराव बोडके हे मारुती कार (क्र. एमएच 02, 1740) मधून बळसाने येथून लग्नानिमित्ताने दुपारी दिघावे (ता.साक्री) येथे जातांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला. कार विहिरीत कोसळल्याची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावले. कासारे येथील ही घटना कळताच गावातील सरपंच विशाल दिसले तसेच गावकरी तरुण तात्काळ मदतीसाठी धावले. मदतकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करत अवघ्या काही वेळातच मदतकार्य केल्यामुळे शंकर बोडके यांना वाचविण्यात यश आले. मात्र इतर चार जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने विहिरीतून तरुणांच्या मदतीने कार बाहेर काढली. मयतांमध्ये एक मुलगा, एक महिला आणि दोन मुलींचा समावेश असून दोघं मुलींचे मृतदेह विहिरी बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे. विहिरीला कठडे नसल्यामुळे कार अनियंत्रित झाल्याबरोबर खोल विहिरीत जाऊन पडली . दरम्यान विहिरीत गाळही भरपूर असल्याने गाडीतील कोणाला सावरण्याची संधी मिळाली नाही. या भीषण अपघातात चालक बचावला असून उर्वरित चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे असून स्पष्ट झाले नसले तरी साक्री पोलीस या प्रकरणी चौकशी करीत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Dhule

पुढील बातम्या