पुरुषांची वटसावित्री..पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत यमराजाला घातलं साकडं

पुरुषांची वटसावित्री..पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत यमराजाला घातलं साकडं

या जन्मी नाही तर पुढच्या जन्मीही अशी बायको देऊ नको, अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादेतील वाळूज परिसरात वटसावित्री साजरी केली. पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या. यमराजाकडे आपले मनोगत व्यक्त केले.

  • Share this:

औरंगाबाद, 15 जून- रविवारी (16 जून) वटसावित्री पौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार, या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळो, अशी मनोकामना परमेश्वराकडे करतात. मात्र, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मीही अशी बायको देऊ नको, अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादेतील वाळूज परिसरात वटसावित्री साजरी केली. पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या. यमराजाकडे आपले मनोगत व्यक्त केले. सरकारने पुरुषांच्या हक्कासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी आंदोनकर्त्यांनी यावेळी केली.

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहरात पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहे. नवरा-बायको समान असल्याचा दावा केला जातो. मात्र, भांडण झाले की, चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदे देखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचे म्हणणे कोणी ऐकत नाही, असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला.

येथे आहे पत्नी पीडित पुरुष आश्रम..

शिर्डी-मुंबई महामार्गावर औरंगाबादपासून 12 किलोमीटर अंतरावर एक आश्रम आहे. तोच आहे पत्नी पीडित पुरुष आश्रम. या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ पत्नी पीडित पुरुषांनी प्रवेश दिला जातो. आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे हे स्वत:ला पत्नी पीडित सांगतात. भारत फुलारे सांगतात की, त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर तब्बल 147 खटले दाखल केले आहेत.

अशी झाली आश्रमाची स्थापना..

भारत फुलारे यांच्यावर त्यांच्या पत्नीने तब्बल 147 खटले दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही काही महिने शहराबाहेर राहण्याची वेळ आली होती. या काळात एकही नातेवाईक त्यांच्या मदतीसाठी धावून आला नाही. त्यांना कायदेशीर सल्ला घेणेही कठीण झाले होत. या काळीत भारत फुलारे यांना तुषार वखरे आणि इतर तिघे भेटले. तेही पत्नी पीडित होते. त्यांनी आपापली सुख-दु:ख वाटून घेतले. त्यांनी एकमेकांना धीर दिला. कायदेशीर लढा देण्यासाठी मदत होईल, या उद्देशातून आश्रम स्थापन करण्याची कल्पना भारत फुलारे यांना सुचली. 19 नोव्हेंवर 2016 रोजी 'पुरुष अधिकार दिनी' स्थापन करण्यात आलेल्या या आश्रमात आतापर्यंत देशभरातील 500 हून जास्त पुरुषांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

आश्रमात प्रवेश मिळवण्यासाठी हे आवश्यक..

आश्रमात प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण आहे. अनेक अटी आहेत. पत्नीने किमान 20 हून जास्त खटले दाखल केले असतील अशाच पुरुषांना पत्नी पीडित पुरुष आश्रमात प्रवेश दिला जातो. गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे येतात. प्रत्येक आठवड्याला शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पत्नी पीडित पुरुषांचे येथे समुपदेशन केले जाते. सुरुवातीला केवळ औरंगाबाद शहर आणि आजुबाजुचे लोक आश्रमात येत होते. आता मात्र, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून बहुतांश लोक येथे येतात. अनुभवी वकीलाप्रमाणे भारत फुलारे हे साक्षीदार आणि पुराव्यांची फाईल बनवण्याचे काम करतात. खटल्यातील संबंधित पुरुषाची कमकुवत बाजू समजून घेऊन कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो.

काळ्या कावळ्याची केली जाते पूजा..

1200 स्क्वेअर फूट जागेत पुरुष पीडित आश्रम आहे. कार्यालयात ठेवलेला काळा कावळा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. दररोज सकाळी आणि सायंकाळी अगरबत्ती लावून या कावळ्याची पूजा केली जाते.

VIDEO: 10 जणांचा चावा घेणारे माकड वन विभागाच्या पिंजऱ्यात

First published: June 15, 2019, 4:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading