अधिकाऱ्यांची अशीही लबाडी, दारू दुकानं आणली 500 मीटरच्या आत !

अधिकाऱ्यांची अशीही लबाडी, दारू दुकानं आणली 500 मीटरच्या आत !

यवतमाळच्या घाटंजीमध्ये दारुची दुकानं वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी दुकानं पाचशे मीटरच्या बाहेर दाखवली. मात्र सजग नागरिकांनी अधिकाऱ्यांची लबाडी उघड केलीये.

  • Share this:

भास्कर मेहेरे, यवतमाळ

09 मे : हायवेजवळची दारुची दुकानं वाचवण्यासाठी आता सरकारी अधिकारीही लबाडी करू लागलेत. यवतमाळच्या घाटंजीमध्ये दारुची दुकानं वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी दुकानं पाचशे मीटरच्या बाहेर दाखवली. मात्र सजग नागरिकांनी अधिकाऱ्यांची लबाडी उघड केलीये.

यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी शहरातून जाणाऱ्या हायवेच्या शेजारची ही दारुची दुकानं... ही दुकानं हायवेच्या अगदी जवळ आहेत. पण अधिकाऱ्यांनी हात ओले करुन ही दुकानं पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला. असं करुन दारुची दहा दुकानं वाचवली गेली. दुसरीकडे स्थानिकांना हा हायवे नगरपरिषदेच्या अखत्यारित आल्याचं सांगण्यात आलं. पण स्थानिकांना संशय आला. त्यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली.

दारू दुकानं वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी मोजणीत घोळ केल्याचं लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मोजणीत दारुची दुकानं आणि हायवेमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा कमी असल्याचं स्पष्ट झालं. सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलाय.

पैशांसाठी अधिकारी प्रसंगी कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करतातच शिवाय सरकारचीही फसवणूक करतात. अशा अधिकाऱ्यांचं फक्त निलंबन नव्हे तर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय.

First published: May 9, 2017, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading