SPECIAL REPORT : रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हतेच, शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय?

SPECIAL REPORT : रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हतेच, शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय?

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं वाद उफळून येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सातारा, 15 जानेवारी : एकीकडे 'आज के शिवाजी' नरेंद्र मोदी या पुस्तकावरचा वाद शमतोय न शमतोय तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एक वक्तव्य केलंय. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असं पवार म्हणालेत. आणि आता या वादावरुन राष्ट्रवादी आणि भाजपत शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

"मला एक गोष्ट समजत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणानं अभ्यास करून वाचला तर छत्रपती यांची उपाधी ही शिवछत्रपती हीच होती, जाणता राजा नव्हती. आणि जाणता राजा हा शब्द हा रामदासांनी आणला होता आणि जे लोक सांगतात रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते हे खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शिवाजी महाराजांच्या गुरू राजमाता जिजामाता होत्या."

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं  वाद उफळून येण्याची शक्यता आहे. एकीकडं 'आज के शिवाजी' या पुस्तकाचा वाद सुरू असतानाच पवारांच्या या विधानामुळं त्यात नव्या वादाची भर पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचा जाणता राजा, असा उल्लेख केला जातो. या उपाधीवरुन उदयनराजे भोसले यांनी  शरद पवारांवर शरसंधान साधलं होतं. त्यावर पवारांनी हे  स्पष्टीकरण दिलं.

जाणता राजा म्हणून म्हणतात, पण मी कुठं म्हणालो मला जाणता राजा म्हणा, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

पवारांच्या या वक्तव्यावर भाजपनं टीकास्त्र सोडलंय. पवार जाणीवपूर्वक हा वाद निर्माण करीत असल्याची टीका भाजपनं केलीय.

खरंतर या पूर्वीही या मुद्यावरुन वाद रंगला होता. आता खुद्द शरद पवारांनीचं हे वक्तव्य केल्यामुळं नव्या वादाची ठिणगी पडली आहे. आता सत्ताधारी शिवसेना यावर  कोणती भूमिका घेणार हे पाहाणं औत्सक्याचं ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: January 15, 2020, 11:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading