SPECIAL REPORT : भाजपातील ओबीसी नेते का आहे अस्वस्थ?

SPECIAL REPORT : भाजपातील ओबीसी नेते का आहे अस्वस्थ?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपवरच्या नाराजीमुळे पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण आता लपून राहिलं नाही

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपवरच्या नाराजीमुळे पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण आता लपून राहिलं नाही. पण खडसेंच्या नाराजीच्या निमित्तानं भाजपातील भाजपातील ओबीसी नेते अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील सत्ता हातची जाताचं  भाजपातील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या  नाराजीच्या निमित्तानं ते समोर आलंय. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळेच रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंचा निवडणुकीत पराभव झाल्याचा जाहीर आऱोप एकनाथ खडसे यांनी केला. खडसेंच्या या भूमिकेमुळे भाजपची  कोंडी झाली असतानाचं त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. त्यांनी  शरद पवार तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये 15-20 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हजर होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जी मागणी केली होती, तीच मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली', असं सूचक वक्तव्य खडसे यांनी केलं.

तसंच आपण शिवसेनेत यावं अशी उद्धव ठाकरेंची इच्छा असणे साहजिक आहे. परंतु,  कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याबद्दल आपला निर्णय झाला नाही, असा खुलासाही खडसे यांनी केला.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

आक्रमक पवित्रा घेतलेल्या खडसे यांचं मनधरणी पक्षातील नेत्यांकडून मनधरणी केली जातेय तर दुसरीकडं सत्ताधाऱ्यांकडून खडसेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला जातोय.

भाजपातील या  पक्षांतर्गत वादावर ओबीसी नेत्यांनीही तोफ डागली आहे. एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची भेट घेतली.

या  नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे पंकजा मुंडेही पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

First published: December 10, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading