SPECIAL REPORT : पुण्यात चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण महासंघाने का केला विरोध?

SPECIAL REPORT : पुण्यात चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण महासंघाने का केला विरोध?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून लढणार असल्याचे संकेत मिळताच त्यांच्या नावाला कडाडून विरोध सुरू झाला.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 30 सप्टेंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून लढणार असल्याचे संकेत मिळताच त्यांच्या नावाला कडाडून विरोध सुरू झाला. विशेषतः ब्राह्मण महासंघाने पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला. तर दुसरीकडे पाटलांच्याविरोधात सर्वमान्य अपक्ष उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली.

सर्वाधिक सुरक्षिक मतदारसंघ म्हणून चंद्रकांत पाटलांनी कोथरूडची निवड केली खरी पण त्यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांच्या उमेदवारीला सुरू झाला. हा मतदारसंघ ब्राह्मण बहुल असल्याने इथं विद्यमान आमदारांना डावलून बाहेरचा उमेदवार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, अशी भूमिकाच ब्राह्मम संघटनांनी घेतली.

ब्राह्मणांना कोथरूडमधूनच डाववलं जात असेल तर मग आम्ही काय गडचिरोलीतून प्रतिनिधीत्व करायचं का? असा सवालच परशूराम सेवा संघाने विचारलाय ब्राह्मण महासंघाने तर थेट पाटलांच्याच नावाला विरोध दर्शवला.

चंद्रकांत पाटील कोथरूडमधून लढणार असल्याचं नक्की होताच सर्वपक्षीय विरोधक खडबडून जागे झाले आहे. त्यांनीही मग माजी सेना आमदार चंद्रकांत मोकाटे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवण्याची तयारी चालवली. त्यामध्ये मग राष्ट्रवादी, मनसे स्वाभिमानी, काँग्रेस असे सगळेच पाटलांच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यासाठी मातोश्रीवरून हिरवा कंदिल मिळणं अजून बाकी हे जणू..

कोथरूडमधून खरंतर विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात खरी चुरस होती. पण हे दोघे राहिले बाजुला स्वतः प्रदेशाध्यक्षच लढण्यात सज्ज झाल्याने भाजपच्या पारंपारिक मतदारांची मोठी गोची झाली.

कोथरूडमधला हा विरोध समजा आणखीनच तीव्र बनला तर दादा ऐनवेळी कसब्याचीही निवड करू शकतात. पण तिथंही बाहेरचा उमेदवार नको म्हणून आत्तापासूनच बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यातली पाटीलकी नेमकी कुठल्या मतदारसंघातून मिळवतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 09:43 PM IST

ताज्या बातम्या