SPECIAL REPORT : औरंगाबादमधील सिडको भागात बिबट्या आला कुठून?

SPECIAL REPORT : औरंगाबादमधील सिडको भागात बिबट्या आला कुठून?

औरंगाबाद शहरातली मध्यवस्ती असलेल्या सिडको एन-1 भागात बिबट्या शिरल्यामुळं रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 03 डिसेंबर : औरंगाबाद शहरातली मध्यवस्ती असलेल्या सिडको एन-1 भागात बिबट्या शिरल्यामुळं रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तब्बल सहा तासानंतर वन खात्याच्या पथकानं  त्याला जेरबंद केलंय पण राज्यातल्या अनेक शहरात घडणाऱ्या या घटनांमुळे एक प्रश्न मात्र निर्माण होतोय की आपण या प्राण्यांचं घर हिरावून घेतल्यानं आज त्यांच्यावर ही वेळ आलीय का?

औरंगाबाद शहराच्या एन -1 सिडको भागात भल्या सकाळी बिबट्याचं दर्शन झाल्यामुळं एकचं खळबळ उडाली. हा परिसर उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. वर्दळीच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळं  काळा गणपती भागातील रहिवाशी भयभीत झाले होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांच्या तो नजरेस पडला आणि बघणाऱ्यांची पाचावरधारण बसली.

काहींनी आपल्या मोबाईल फोनमध्ये त्याची छबी कैद केली. त्यानंतर स्थानिकांनी वनविभागाला त्याची माहिती दिली आणि मग सुरू झाली बिबट्याची शोध मोहीम.

दरम्यान, हा बिबटया या परिसरातील एका  पडक्या घरात दडून बसला होता. वन विभागाच्या पथकानं त्या घराला चारी बाजूने जाळ्या लावून बिबट्याचा मार्ग रोखला.

बिबट्याच्या हालचालींचा अंदाज घेतल्यानंतर वन विभागाच्या अधिकऱ्यांनी  त्याला डॉट मारुन बेशुद्ध केलं. त्यानंतर वन विभागाच्या पथकानं बिबट्याला पिंजऱ्यात बंद केलं.

खरंतर हा परिसर शहराच्या मध्यभागी असून इथं दाट नागरी वस्ती  आहे. बिबट्याच्या वावरामुळं रहिवाशी हादरुन गेले होते. पण अखेर तो जेरबंद झाल्यामुळं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2019, 10:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading