SPECIAL REPORT : पुण्यातील 'या' शाळेत विद्यार्थ्यांना तिसऱ्यांदा मिळते मधली सुट्टी, 'हे' आहे कारण

SPECIAL REPORT : पुण्यातील 'या' शाळेत विद्यार्थ्यांना तिसऱ्यांदा मिळते मधली सुट्टी, 'हे' आहे कारण

शाळेतील शिक्षक प्रकाश शेलार यांनी हा अभिनव उपक्रम राबवला आहे. केरळमधल्या एका शाळेत हा प्रयोग पहिल्यांदा राबवला गेला.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे,प्रतिनिधी

पुणे, 22 नोव्हेंबर : कोणत्याही शाळेत खरंतर सर्वसाधारणपणे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या अशा दोनच बेल होतात. पण पुण्याच्या एका शाळेत आता आणि आणखी एक बेल वाजवली जात आहे. कोणती आहे ती बेल आणि कशासाठी वाजवली जातेय?

हे आहे पुण्यातले एरंडवणा माध्यमिक विद्यालय..पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आम्ही तुम्हाला ही शाळा का दाखवतोय. तर या शाळेत विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तो म्हणजे वॉटर बेलचा.

शाळेत दोनदा विद्यार्थ्यांसाठी वॉटर बेल वाजवण्यात येते. वॉटेर बेल वाजली की विद्यार्थी हे असं पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात. पुरेसं पाणी न पिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम शाळेनं हाती घेतला आहे.

शाळेतील शिक्षक प्रकाश शेलार यांनी हा अभिनव उपक्रम राबवला आहे. केरळमधल्या एका शाळेत हा प्रयोग पहिल्यांदा राबवला गेला. त्यानंतर पुण्यातील शाळेनं वॉटर बेलची संकल्पना राबवली.

मुलांनी दिवसभरात पुरेसं पाणी न पिल्यास अनेक आजारांना सामोर जावं लागतंय. वॉटर बेल या उपक्रमातून मुलांमधील आजार कमी होण्यास मदत होणार आहे. एवढं मात्र नक्की.

===================================

Published by: sachin Salve
First published: November 22, 2019, 7:37 AM IST
Tags: puneschool

ताज्या बातम्या