SPECIAL REPORT : कधीकाळी होते राज ठाकरेंचे राईट हँड, आता भाजपची वाढवणार डोकेदुखी?

भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अनेक शहरांमध्ये नाराजी उफाळून आली.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 05:49 PM IST

SPECIAL REPORT : कधीकाळी होते राज ठाकरेंचे राईट हँड, आता भाजपची वाढवणार डोकेदुखी?

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 02 ऑक्टोबर : नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तिकीट नाकारल्यानं प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते बंडखोरीच्या तयारीत आहेत. लवकरच त्यांचा निर्णय जाहीर होणार आहे.

भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अनेक शहरांमध्ये नाराजी उफाळून आली. नाशिकमधले बडे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांना तिकीट मिळालं नाही. एके काळी राज ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेले वसंत गीते 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर आमदार झाले. मनसेला उतरती कळा लागल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, उमेदवारी मिळत नसल्यानं त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे.

वसंत गीते मागील 40 वर्षांपासून राजकारणात आहेत. शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं वसंत गीतेंनी स्पष्ट केलं.

भाजपसमोर आघाडीनं नव्हे तर बंडखोरांनी आव्हान केल्याचं चित्र आहे. आता भाजप बंडोबांची समजूत कशी काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

खडसे आणि तावडे ही वेटिंगमध्ये

दरम्यान, भाजपमध्ये पहिल्या यादीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव यादीत नव्हतं. त्यामुळे नाराज झालेले एकनाथ खडसे यांनी डमी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी येण्यापूर्वी विनोद तावडे यांनी आज चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पहिल्या यादीत नाव नसल्याने आज तावडेंनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, आज भाजपची दुसरी यादी जाहीर होणार आहे.

चंद्रकांत पाटलांची अडवली गाडी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या A9 या शासकीय निवासस्थानासमोर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रोखली. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर एकच गोंधळ घातला. आमदार सुधाकर भालेराव यांचे पहिल्या यादीत नाव नसल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, समर्थकांनी पाटील यांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन देखील केलं.

======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...