SPECIAL REPORT : भाजपवासी उदयनराजेंचा इमोशनल अत्याचार की प्रेम?

SPECIAL REPORT : भाजपवासी उदयनराजेंचा इमोशनल अत्याचार की प्रेम?

उदयराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर शरद पवारांनीही उदयनराजेंना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : राष्ट्रवादीचं घड्याळ काढून भाजपचं कमळ हातात घेणाऱ्या उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली. त्यात उदनयराजे पवारांचं हे आव्हान कसं स्विकारणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या. त्यात पवार मैदानात उतरणार असतील तर आपण मैदान सोडू असं सांगत उदयनराजेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

स्टाईलीश नेते आणि भल्याभल्यांना शिंगावर घेणारे डॅशिंग नेते अशी उदयनराजेंची ओळख. पण आज उदयनराजेंचं इमोशनल रुप पाहायला मिळालं. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले.

उदयनराजेंनी भाजपचं कमळ हाती धरल्यानंतर शरद पवारांनी साताऱ्यात जावून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. शिवाय नाव न घेता उदयनराजेंवर टीकेची झोड उठवली. या टीकेला उदयनराजे काय प्रत्युत्तर देतात याची सगळ्यांना उत्सुकता होती. पण पवार उभे राहाणार नसतील तर आपण मैदानात उतरणार नाही, असं सांगत उदयनराजेंनी सगळ्यांनाच कोड्यात टाकलं आहे.

उदयनराजे भोसले म्हणतात, 'खरंच त्यांनी उभं राहावं. देवाशपथ सांगतो. मी बोंबलत फिरायला मोकळा. त्यांनीच उभं राहायला पाहिजे. एकदा आजमावून तर बघा. ह्यला म्हणत्यात स्टाईल. स्टाईल ईज स्टाईल. उगीच बोलत नाही. त्यांनी सांगू द्या फक्त. न्हाय ऐकलं तर काय पण सांगा."

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. उदयराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर शरद पवारांनीही उदयनराजेंना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश जिव्हारी लागल्यानं शरद पवार ताकदीनं मैदानात उतरलेत. तर राजकीय अस्तित्वासाठी उदयनराजेंना ही लढाई जिंकावीच लागणार आहे. त्यामुळे साताऱ्यातल्या पवार विरुद्ध उदयनराजेंच्या तुल्यबळ सामन्याला राजकीय इर्शेबरोबरच भावनिक पदरही असणार आहे.

============

Published by: sachin Salve
First published: September 24, 2019, 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading