तुझ्यावर प्रेम आहे सांगून अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार, महाराष्ट्राचा होतोय उत्तर प्रदेश?

तुझ्यावर प्रेम आहे सांगून अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार, महाराष्ट्राचा होतोय उत्तर प्रदेश?

2015-16 मध्ये अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या संख्येत 400 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या दिवसाला 100 पेक्षा जास्त मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहे.

  • Share this:

हर्षल महाजन आणि स्वप्नील घाट, प्रतिनिधी

गुहागर, 11 जून : एकाच दिवशी राज्यात दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्यात. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नागपूर आणि गुहागरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राला हादरा बसला आहे.

कठुआ बलात्कार प्रकरणातील नराधमांना कायद्यानं जन्माची अद्दल घडली तरी चिमुकल्या मुली सुरक्षित नाहीत हे वारंवार समोर येतं आहे. नागपूरच्या वाडी परिसरात चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली. पीडित चिमुकली त्याच परिसरातील एका शाळेत मुलांसोबत खेळत होती. त्याचवेळी नराधमानं तिच्यावर अत्याचार केले. रात्री उशिरा आईच्या लक्षात आल्यानंतर वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तर तिकडे माझे तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुहागरमध्ये घडली. गुहागर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहे.

रोज 100 अत्याचाराच्या बळी!

आकड्यांवर नजर टाकल्यास 2001 ते 2016 दरम्यान मुलांविरोधातील अत्याचारात 889 टक्क्यांनी वाढ झाली आहे.2001 मध्ये 10,814 तक्रारी दाखल झाल्या तर 2016 मध्ये ही संख्या 5,95089 वर पोहचली. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार, 2015-16 मध्ये अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या संख्येत 400 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या दिवसाला 100 पेक्षा जास्त मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहे.

बाल लैंगिक अत्याचार कायद्यात सुधारणा करूनही अत्याचार थांबत नाही. त्यामुळे वाढते बलात्कार आणि त्यातही अल्पवयीन मुला-मुलींवर होणारे बलात्काराची विकृती आपल्या सगळ्यांसाठी गंभीर बाब बनली आहे.

======================

First published: June 11, 2019, 8:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading